छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीवर केला दुग्धाभिषेक व जलाभिषेक. छत्रपतींचा जयघोष.
डिचोली/प्रतिनिधी
बजरंगदल, विश्वहिंदू परिषद, शिवप्रति÷ान हिंदुस्थान व डिचोलीतील शावप्रेमींतर्फे डिचोलीत शिवराज्याभिषेक काल रविवारी मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ावर दुग्धाभिषेक, जलाभिषेक, पुष्पहार अर्पण करून मंत्रोचारण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने हा परिसर दणाणून सोडला.
यावेळी विजय होबळे, शेखर नाईक, रामचंद्र पळ, गोविंद साखळकर, संजय नाईक, मंदार गावडे, शांती सागर आवळे, प्रसाद नाईक, पापुराज मयेकर, उदय जांभेकर, शैलेश जाधव, संदेश सरफ व इतरांची उपस्थिती होती.
शांतीसागर आवळे यांनी जलाभिषेक, दुग्धाभिषेक, मंत्रोचारण केले, मंदार गावडे यांनी पुष्पहार अर्पण केला. व शिवरायांचा जयघोष करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण जनतेसाठी एक सुवर्णक्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवलेली ठेव आपण राखून ठेवण्यासाठी आज संघटीत होणे गरजेचे बनले आहे. छत्रपतींनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेला आदर्श आजच्या पिढीने आपल्या आचरणात आणून एक सुसंस्कृत आणि अन्यायाविरुद्ध लढणारे राज्य स्थापन करण्यासाठी झटावे, असे आवाहन यावेळी मंदार गावडे यांनी केले.