प्रतिनिधी/ पणजी
श्री गणेश मंडळ पर्रा ट्रस्टच्या श्री वरद सिद्धिविनायक मंदिरातील 16 वा मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापनसोहळा मंगळवार 19 एप्रिल रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी 6.30 वाजता महाअभिषेक, 8.30 वाजता यजमान हस्ते गणपती पूजन पुण्याहवाचन स्थलशुद्धी, कलशस्थापना अथर्वशीर्ष आवर्तन 10.30 वाजता संग्रहमक अथर्वशीर्ष हवं 12.30 वाजता बली पूर्णाहुती, 1 वाजता महाआरती व महाप्रसाद होईल. पूजेचे यजमानपद श्री व सौ. रश्मी राजन कायसूकर यांना लाभलेले आहे. दुपारी 1 ते 3 वाजता महाप्रसाद, संध्याकाळी 7 वाजता दीपोत्सव, नंतर बँडवादनाच्या गजरात श्रीची पालखी प्रदक्षिणा व आरती होईल.
या सोहळय़ाला बहुसंख्येने उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन श्री गणेश मंडळ पर्राट ट्रस्ट कार्यकारी समितीतर्फे करण्यात आले आहे.