ST Protest : प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार आहे. प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर संप करण्याचा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी,सातवा वेतन आयोग लागू करावा या मागण्यांसाठी हा संप असणार आहे.
शासनाने नुकतच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4 टक्क्यांची वाढ झाल्याचा जीआर काढला आहे. या जीआरनुसार आता महागाई भत्ता 38 टक्क्यांवर पोहोचला आहे.मात्र शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 42 टक्के असून एसटी कर्मचाऱ्यांनाही 42 टक्के महागाई भत्ता मिळावा अशी मागणी संघटनेने केली आहे. राज्य सरकारने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर 13 सप्टेंबरपासून राज्यातील सर्व जिल्हास्तरावर हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं परिपत्रक महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेच्या वतीनं काढण्यात आलं आहे.