Tarun Bharat

टॉपर उत्तरपत्रिकांची होणार तीन सदस्यांकडून तपासणी

Advertisements

चोख पेपर तपासणीसाठी नवीन नियम लागू करण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी /बेळगाव

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत पैकीच्या पैकी गुण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्याने चोख पेपर तपासणीसाठी शिक्षण विभागाकडून नवीन नियम लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पुढील वषीपासून टॉपर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तीन सदस्यांकडून तपासणी केली जाणार आहे.

2022 मध्ये लागलेल्या निकालात 625 पैकी 625 गुण 217 विद्यार्थ्यांनी मिळविले. तर 620 ते 625 मध्ये 773 विद्यार्थी होते. 2020 मध्ये पैकीच्या पैकी गुण घेणाऱया विद्यार्थ्यांची संख्या केवळ 11 होती. वाढलेली ही गुणवत्ता पुढील पिढीसाठी धोकादायक असल्याने आतापासूनच चोख पेपर तपासणीसाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

टॉपर विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका एका शिक्षकाने तपासल्यानंतर त्यावर आणखी दोन शिक्षक तपासणी करणार आहेत. त्यांना उत्तरे योग्य न वाटल्यास गुण कमी करण्याचे अधिकार दिले जाणार आहेत. यामुळे गुण वाढीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवता येणार आहे.

राज्यातील दहावी परीक्षेचा आढावा

वर्ष625 पैकी 625 गुण घेणारे विद्यार्थी620 ते 625 गुण घेणारे विद्यार्थी
2022217773
2021158925
202011301

10 लाखांचा शिक्षकांना दंड

पेपर तपासणीपूर्वीच शिक्षण विभागाने योग्य पद्धतीने पेपर तपासणी न करणाऱया शिक्षकांवर दंड आकारला जाईल, असे स्पष्ट केले होते. बऱयाच विद्यार्थ्यांचे फेर तपासणीमध्ये गुण वाढले असल्याने पेपर तपासणी करणाऱया शिक्षकांकडून दंड वसूल केला जाणार आहे. संपूर्ण राज्याचा विचार करता 10 लाख 56 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.

Related Stories

चक्क माकडांनीही राखले सामाजिक अंतराचे भान

Amit Kulkarni

मच्छे येथे चोरटय़ांनी घर फोडून सोने-चांदीसह साहित्य लांबविले

Amit Kulkarni

हिंडलगा ग्रा.पं.तर्फे अनोखा उपक्रम

Amit Kulkarni

महसूलवाढीसाठी विविध प्रस्ताव राबविण्यास मंजुरा

Omkar B

खादरवाडीसह ग्रामीण भागात काँग्रेसचा प्रचार

Patil_p

‘त्या’ तरुणाच्या खून प्रकरणी एफआयआर दाखल

Patil_p
error: Content is protected !!