Tarun Bharat

मयडे गावात बुधवारी सायंकाळी मशाल मिरवणूक

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त हळदोणा भाजपा मंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती उत्तर गोवा भाजपा समितीचे उपाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो यांनी मंगळवारी दि. 9 रोजी म्हापशातील भाजपा उत्तर गोवा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

यावेळी राज्य कार्यकारी सदस्य शिवानंद शिरोडकर, माजी सरपंच रणजीत उसगांवकर व श्रीकांत नाईक उपस्थित होते. दि. 11 रोजी सायं. 5 वा. नास्नोळा गावात प्रभात फेरीचे सायंकाळी आयोजन केले आहे. तर 13 रोजी बस्तोडा-बांद येथील सत्पुरुष मंदिराकडून दुचाकी फेरीला प्रारंभ होईल. अशी माहिती फ्रँकी कार्व्हालो यांनी दिली. दरम्यान ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत लोकांनी मोठय़ा उत्साहाने व संख्येने सहभाग घेत आपल्या घरांवर तिरंगा फडकावा असे आवाहन कार्व्हालो यांनी केले. याशिवाय पंचायत निवडणुकीत हळदोणा मतदारसंघातील सहाही पंचायतींमधून रिंगणात उतरलेले सर्व भाजपा कार्यकर्ते उमेदवार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

अरविंद केजरीवाल गोव्यात दाखल

Sumit Tambekar

गोमंतकीयांनी चित्रपट निर्मितीकडे वळावे

Patil_p

प्रथम सर्व सुविधा उपलब्ध करा, नंतरच ऑनलाइन शिक्षण

Amit Kulkarni

एकत्रितपणे गणेश विसर्जनाची परंपरा आजही कायम

Amit Kulkarni

आयरिश पंतप्रधानांची वराडला भेट

Patil_p

विदेशी पर्यटक कोरोना पॉझिटिव्ह

Omkar B
error: Content is protected !!