Tarun Bharat

वर्ल्ड चॅम्पियनशिप बॅडमिंटनमध्ये भारतीयांना कठीण ड्रॉ

Advertisements

22 ऑगस्टपासून स्पर्धेचे  टोकियोत आयोजन

वृत्तसंस्था/ टोकियो

22 ते 28 ऑगस्ट या कालावधीत येथे बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप होणार असून भारतीय स्पर्धकांना त्यात कठीण ड्रॉ मिळाला आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यानंतर त्याचीच पुनरावृत्ती या स्पर्धेत करण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न असेल.

बुधवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला असून भारतीय खेळाडूंच्या लढती जगातील सर्वोत्तम खेळाडूंशीच होणार असल्याचे त्यात दिसून आले. 2019 ची वर्ल्ड चॅम्पियन पीव्ही सिंधूची मागील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये निराशाजनक कामगिरी झाली होती. त्याची भरपाई यावेळी करण्यास ती उत्सुक असेल. जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असणाऱया सिंधूला पहिल्या फेरीत बाय मिळाला असून ड्रॉच्या पहिल्या भागात तिचा समावेश आहे. दुसऱया व तिसऱया फेरीत ती हान युइ व वांग झि यी यांच्यावर ती मात करेल, अशी अपेक्षा आहे. या लढती जिंकल्यानंतर तिची कट्टर प्रतिस्पर्धी द.कोरियाच्या तिसऱया मानांकित ऍन से यंगशी लढत होईल. या दोघींत आतापर्यंत पाच लढती झाल्या असून सिंधूने  तिच्यावर एकदाही विजय मिळविलेला नाही.

सायना नेहवालचा ड्रॉच्या दुसऱया भागात समावेश असून हाँगकाँगच्या चेयुंग एन्गन यी हिच्याविरुद्ध तिची सलामीची लढत होईल. ही लढत जिंकल्यास सायनाची दुसरी लढत जपानच्या सहाव्या मानांकित नोझोमी ओकुहाराशी होईल. भारताची आणखी एक खेळाडू मालविका बनसोडची पहिली लढत डेन्मार्कच्या लिने ख्रिस्तोफर्सनशी होईल.

भारताच्या चार पुरुष बॅडमिंटनपटूंनी एकेरीसाठी पात्रता मिळविली असून त्यापैकी लक्ष्य सेन, किदाम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय हे तिघे ड्रॉच्या एकाच बाजूस आहेत तर साई प्रणीत मात्र वरच्या भागात असून पहिल्या फेरीत त्याला कठीण प्रतिस्पर्धी मिळाला आहे. डेन्मार्कच्या हान्स क्रिस्टियन सोलबर्ग व्हिटिंगहसशी त्याचा सामना होईल तर प्रणॉयची लढत जपानच्या द्वितीय मानांकित केन्टो मोमोटाशी होईल. मोमोटाचा फॉर्म अलीकडे हरविल्याचे दिसून आले असून प्रणॉयची उपउपांत्यपूर्व फेरीत लक्ष्य सेनशी गाठ पडू शकते.

पुरुष दुहेरीचे स्पेशालिस्ट सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी यांना पहिल्या फेरीत बाय मिळाला असून दुसऱया फेरीतही त्यांना सोपी प्रतिस्पर्धी जोडी मिळाली आहे. पण उपउपांत्यपूर्व फेरीत त्यांना सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.  या फेरीत गोह व्ही शेम व टॅन वी किआँग या मलेशियन जोडीशी गाठ पडणार आहे. भारताच्या महिला दुहेरीच्या चार जोडय़ा आणि मिश्र दुहेरीच्या दोन जोडय़ाही या स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत.

Related Stories

कोणी टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू?

Patil_p

ऑस्ट्रियाचा थिएम पहिल्याच फेरीत पराभूत

Patil_p

‘जखमी’ वाघांची संस्मरणीय झुंज

Patil_p

रशियाऐवजी चेन्नईत होणार ‘चेस ऑलिम्पियाड’

Patil_p

नेसरबरोबरचा सरेचा करार रद्द

Patil_p

लॉसेन स्पर्धेत झिदान्सेक विजेती

Patil_p
error: Content is protected !!