Tarun Bharat

5 दिवसांमध्ये 50 राज्यांची टूर

Advertisements

तीन मित्रांनी नोंदविला अनोखा विक्रम

हिंडण्या-फिरण्याचा एक जबरदस्त छंद असतो आणि हा छंद असलेल्या लोकांना संधी मिळाली तर ते दीर्घकाळ प्रवासास बाहेर न पडल्यास त्यांना कोंडल्यासारखे वाटू लागते. तीन मित्रांनी स्वतःच्या या छंदापोटी एक अनोखा विक्रमच नोंदविला आहे.

ऑस्टिन येथील तीन मित्रांनी एकत्रितपणे 5 दिवसांत 50 राज्यांची भ्रमंती केली आहे. याच भ्रमंतीच्या बळावर त्यांनी विश्वविक्रम केला आहे. ऑस्टिन येथील पीटर मॅकोनविल, पावेल ‘पाशा’ क्रेचेतोव्ह आणि मिनियापोलीसच्या अब्दुल्लाही सलाहने कारने प्रवास करत हा अत्यंत अनोखा विश्वविक्रम केला आहे.

तिघांनी स्वतःच्या प्रवासाची सुरुवात वरमोंट येथून केली. थॉमस कॅनन आणि जस्टिन मॉरिस यांचा विक्रम मोडीत काढण्याचे लक्ष्य त्यांनी बाळगले होते. या तीन मित्रांनी 5 दिवस, 16 तास आणि 20 मिनिटांमध्ये सर्व 50 राज्यांची भ्रमंती केली आहे. तर अलास्का आणि हवाईचा स्वतःचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांनी कारद्वारे स्वतःची भ्रमंती सुरू केली होती. त्यानंतर त्यांना विमानाद्वारे प्रवास करायचा होता. तेथे त्यांनी 5 दिवस 13 तास आणि 10 मिनिटांमध्ये हा प्रवास संपविला आहे. या 5 दिवस आणि काही तासांमध्ये त्यांनी एकत्रित 50 राज्यांचे भ्रमण करत नवा विक्रम नोंदविला आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने 1996 मध्ये जलद प्रवासाच्या विक्रमाची शेणीच बंद केली आहे. अत्याधिक वेग किंवा बेजबाबदार ड्रायव्हिंगबद्दल लोकांना प्रोत्साहन मिळू नये हा यामागचा उद्देश होता.

तरीही मॅकॉनविले आणि त्यांच्या मित्रांना आता ऑल 15 स्टेट क्लबद्वारे स्पीड रेकॉर्डधारकांच्या यादीत सामील करण्यात आले आहे. 5 दिवसांमध्ये 50 राज्यांचे भ्रमण करणे सोपे नव्हते. अशा स्थितीत त्यांच्याकडे अधिक विश्रांतीची संधी नव्हती.

Related Stories

जपानमध्ये लसप्रयोग

Patil_p

दर 30 वर्षांनी खडक देतो अंडी

Patil_p

युक्रेन युद्धाच्या उंबरठय़ावर

Patil_p

स्वीत्झर्लंडमध्ये नवा पुढाकार

Amit Kulkarni

भारत आणि चीन : दोन झोपाळू देश

Patil_p

आसामच्या चहा कंपनीकडून वोल्दोमिर झेलेंस्कींचा सन्मान

Omkar B
error: Content is protected !!