दुर्घटनेत 40 जण जखमी
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी केरळच्या इडुक्की जिल्हय़ात पर्यटकांची एक बस दरीत कोसळली असून या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर 40 जण जखमी झाले आहेत. तिरुरच्या एका औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी स्वतःच्या कॉलेजमध्ये बसने परतत होते. मृत विद्याथ्याचे नाव मिल्हाज असल्याचे समजते. कॉलेजचे विद्यार्थी हे तामिळनाडूच्या कोडाइकनाल येथून परतत होते. दुर्घटनेची माहिती कळताच स्थानिक लोकांनी पोलीस-प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू केले होते. दुर्घटनेचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच जखमींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दुर्घटनेची माहिती कळताच इडुक्की जिल्हाधिकाऱयांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्याला वेग दिला आहे.