प्रतिनिधी /फोंडा
बोंडला-उसगांव येथील उत्सवातून परतीच्या वाटेवर असताना पर्यटक बस उलटून सुमारे बाराजण प्रवासी जखमी झाले. सदर घटना काल रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. बारापैकी चार जखमींना बाबोंळी येथील गोमेकॉत तर दोघां जणांना पुढील उपचारासाठी मडगांव येथील हॉस्पिसियो येथे पाठविण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमीमध्ये शोभा नागप्पा (40, टॉपकोला-बोरी), शोरला च्यारी (421, बोरी), मारीया रॉड्रिगिझ (55, पंचवाडी), संपदा बोरकर (21), संजीत बांदोडकर 14 ( 14, मडगांव), विद्याधर नाईक (70, बोरी), सिद्धेश नाईक (39), आंतोन फर्नाडीस (58), सुकोरो रॉड्रीगिझ (56), चंद्रशेखर वर्गीस (16), अनुष्का फर्नाडीस (52), महेद नाईक (39) यांचा जखमीमध्ये समावेश आहे. दरवर्षी बोंडला येथे होणाऱया उत्सवात हे भाविक सहलीचे आयोजन करीत असे. पुरूष उत्सवात सहभागी होत असत तर महिला बेंडला अभयारण्यात सहलीचा आनंद घेत असे. परतीच्या वाटेवर असताना वळणावर वाहनचालकाचा ताबा गेल्याने हा अपघात घडल्याचे जखमी प्रवासींचे म्हणणे आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जखमींना पिळय़े धारबांदोडा येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर सहाजणांना पुढील उपचारासाठी गोमेकॉत व हॉस्पिसियोत पाचारण करण्यात आले.