Tourist drowned in Tarkarli sea
तारकर्ली समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या औरंगाबाद येथील सचिन एकनाथ जाधव २२ याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. औरंगाबाद येथील ६ जण पर्यटनासाठी मालवण तारकर्ली येथे आले होते. एमटीडीसी रिसॉर्टच्या जवळ सदर पर्यटक रविवारी दुपारी आंघोळीसाठीसाठी उतरले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती समजताच सहदेव साळगावकर, राम चोपडेकर, भानुदास येरागी, प्रभाकर वाळवे, जयवंत सावंत, वैभव सावंत, मनोज खोबरेकर, दत्तराज चव्हाण, संजय तयारी, प्रफुल्ल मांजरेकर, उल्हास तांडेल यांनी मदतकार्य केले.
मालवण / प्रतिनिधी