Tarun Bharat

सत्तरीतील धबधब्यांवर शौचालय, कपडे बदलण्याची सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची गैरसोय

प्रतिनिधी /वाळपई

सध्या जोरदारपणे प्रवाहित धबधब्यांवर सत्तरी तालुक्मयातील मौजमजा करण्यासाठी आज हजारो पर्यटकांनी हजेरी लावली. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसल्यामुळे पर्यटकांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे पर्यटकांकडून धबधब्याच्या ठिकाणी अशा सुविधा उपलब्ध करण्याची मागणी करण्यात येत आहे. वनखात्याच्या माध्यमातून शुल्क आकारले जाते मात्र साधन सुविधा का उपलब्ध करण्यात येत नाहीत ? असा सवालही पर्यटकांनी व स्थानिकांनी केला आहे.

 सत्तरी तालुक्मयात पावसाळी मोसमात अनेक ठिकाणी डोंगरावरून धबधबे कोसळतात. यंदाही मोठय़ा प्रमाणात धबधब प्रवाहीत  झाले आहेत.दोन आठवडय़ापासून या ठिकाणी शनिवारी व रविवारी मोठय़ा प्रमाणात पर्यटक या धबधब्यावर सहलीसाठी येत आहेत. अनेक सामाजिक ,सांस्कृतिक, वैचारिक संस्थातर्फे पदब्रम्हण मोहीम धबधब्यांवर आयोजित करण्यात येत असतात.याच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक चार महिन्यांसाठी येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

दरम्यान आज दिवसभर सत्तरी तालुक्मयातील पाली, हिवरे, चरावणे, नानैली कुमठोळ, शेळपे व इतर धबधब्यावर मोठय़ा प्रमाणात पर्यटक आले होते. पणजी मडगाव म्हापसा आदी भागातून खास बसेस घेऊन पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात धबधब्यावर हजेरी लावून आनंद लुटला.

कपडे बदलण्यासाठी तसेच शौचालय सुविधेचा आभाव

दरम्यान अनेक पर्यटकांनी आपली खंत व्यक्त करताना वन खात्याने धबधब्यावर सुविधा निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. खास करून महिलांसाठी शौचालयाची आवश्यकता उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच धबधबावर येणाऱया पर्यटकांना कपडे बदलण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध झालेली नाही. यामुळे खास करून महिलांना ही समस्या निर्माण होत असून कपडे बदलण्यासाठी तसेच शौचालयाची सुविधा उपलब्ध करणे अत्यंत गरजेचे असल्याचे महिला वर्गाचे म्हणणे आहे.

दरम्यान, गेल्या दोन आठवडय़ापासून वन खात्याच्या अभयारण्य व्यवस्थापनातर्फे प्रत्येक पर्यटकाकडून शंभर रुपयाची शुल्क आकारण्यात येत आहे. धबधब्यावर निर्माण होणाऱया कचरा साफ करण्यासाठी सदर शुल्क आकारले जात आहे, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मात्र पर्यटकांना निर्माण होणाऱया समस्यांचे काय अशा प्रकारचा सवाल पर्यटकांनी व स्थानिकांनी केलेला आहे.

 वनविकास महामंडळाच्या अध्यक्ष तथा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी याची दखल घेऊन सुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Related Stories

भाजप सहकार विभागाकडून सक्रियपणे काम व्हावे

Omkar B

दहशतवाद विरोधी मॉक ड्रील

Patil_p

भूमिपुत्र विधेयक मागे न घेतल्यास आंदोलन

Amit Kulkarni

उमेदवारीच्या स्वयंघोषणेचा अधिकार कुणालाच नाही

Amit Kulkarni

स्वरदीपचा संगीत प्रदर्शन कार्यक्रम रंगला

Omkar B

विशांत नाईक ठरला कोरोना बाधितांसाठी दुवा …!

Amit Kulkarni
error: Content is protected !!