वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
टोयोटा किर्लोस्कर मोटार (टीकेएम) कंपनी एसयुव्ही अर्बन क्रूझर आणि हॅचबॅक ग्लांजा यांच्या किमती 1 मे 2022 पासून वाढविण्याच्या तयारीत आहे. कंपनीने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार वाहन निर्मितीच्या खर्चात झालेल्या वाढीच्या कारणास्तव किमतीत वाढ करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
आता अर्बन क्रूझरची किमत 8.88 ते 11.58 लाख रुपये या दरम्यान असून ग्लांजाची किमत 6.39 ते 9.96 लाख रुपयाच्या दरम्यान राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. टीकेएमच्या अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार उत्पादन खर्चाच्या कारणास्तव मूल्यात वाढ केली जात असून यामध्ये किमती योग्य त्या ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम
साधारणपणे पोलाद, ऍल्यूमिनिअम आणि अन्य महाग झालेल्या धातूंमुळे कंपनीच्या उत्पादन खर्चावर भार वाढतो आहे. परिणामी कंपनीला वाहनांच्या किमती वाढविण्यावाचून पर्याय नसतो.