Tarun Bharat

Sangli : अवकाळी पावसामुळे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान

कुंडल : वार्ताहर

अचानक आलेल्या अवकाळीपावसाने कुंडल (Kundal) परिसरात जनजिवन विस्कळित झाले असून व्यापारी आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. रविवारी कुंडलचा आठवडा बाजार असल्याने दुपारपासूनच व्यापारी व छोटेमोठे व्यावसायिक व व्यापारी यांनी आपले स्टॉल लावल्यावर साधारणता सायंकाळी ५ वा आचानक मोठ्या पावसास सुरुवात झाली. जवळपास 20 मिनीटे मोठा पाऊस पडल्याने अनेक स्टॉलधारक, मसाला, किराणा, कापड यासह अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. अनेक व्यापाऱ्यांनी पाऊसाची शक्यताच नसल्याने स्टॉलवर झाकण्यासाठी काहीच न आणल्याने त्यांचा माल भिजून मोठे नुकसान झाले.

कुंडल परीसरात झालेल्या या पावसामुळे फुले पडण्याच्या टप्प्यात असणाऱ्या द्राक्षबागांवर मोठा परीणाम होणार आहे. तर ऊस तोडीवर ही काहीसा परीणाम झाला असला तरी गहु, हरबरा या सारख्या पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे.

Related Stories

जतचा पाणीप्रश्न न सुटल्यास जत बंद ; रिपाईचा इशारा

Archana Banage

सांगली शहरात नवे ४४ रुग्ण

Archana Banage

दिवसाढवळ्या माधव नगर येथे सराफ दुकानात चोरी

Archana Banage

भाजयुमोच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी राहूल महाडीक यांची निवड

Archana Banage

सांगली : मिरजेत डॉक्टराचा बंगला कामगारानेच फोडला

Archana Banage

सांगली : दोन हजाराची लाच स्विकारताना तलाठ्यास रंगेहाथ अटक

Archana Banage