Tarun Bharat

बेळगावचा पारंपरिक दसरा

Advertisements

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव शहरात पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा होतोय. आजही ही परंपरा बेळगावमध्ये जपली जात आहे. बेळगावची ग्राम देवता म्हणून ओळखल्या जाणाऱया मारूती गल्ली येथील मारुती मंदिरापासून पालखी मिरवणूक निघते. बेळगाव परिसरातील सर्व पालख्या मारुती मंदिर येथे आल्यानंतर प्रदक्षिणा घालून त्यानंतर मिरवणुकीला सुरूवात होते.

चव्हाट गल्ली येथील दोन सासन काठय़ा, बसवाण गल्ली येथील सासनकाठी, अंबाबाईची सासनकाठी, कपिलेश्वर, मातंगी, नामदेव महाराज, समादेवी, स्वामी समर्थ, नार्वेकर गल्ली येथील जोतिबा मंदिराची पालखी, कंग्राळ गल्ली येथील दुर्गादेवी यासह विविध देवतांच्या पालख्या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. काही पालख्या हुतात्मा चौकापासून मुख्य मिरवणुकीत सहभागी होतात. चव्हाट गल्ली येथील जोतीबा मंदिराचा नंदी मिरवणुकीच्या पुढे असतो तर मारूती गल्ली येथील मारूती मंदिराचे वाहन (छबीना) मिरवणुकीच्या अग्रभागी असते.

हुतात्मा चौकापासून किर्लोस्कर रोड, धर्मवीर संभाजी चौक, कॉलेज रोड, यंदे खुट, बेननस्मिथ कॉलेज रोड, ज्योती कॉलेजच्या मैदानावर पालख्या स्थिरावतात. मैदानावर आपटय़ाच्या फांद्या व शस्त्र ठेवून पूजन केले जाते. मानकऱयांकडून गाऱहाणे घातले जातात. मानाच्या नंदीने बन्नी मोडल्यानंतर उपस्थित नागरिक सोने लुटून विजयादशमी साजरी करतात. आरती झाल्यानंतर लुटलेले सोने पालख्यांवर घातले जाते. त्यानंतर पालख्या आपापल्या मंदिरांमध्ये परततात.  

अर्जुन पुजारी (मारूती मंदिराचे पुजारी)

आमची दहावी पिढी मारूती मंदिराची सेवा करीत आहे. गावचा रक्षक म्हणून मारूतीरायाची ओळख आहे. बेळगावमध्ये साजरा केला जाणारा सीमोल्लंघन हा पारंपरिक पद्धतीने होतो. दसऱया दिवशी गावातील सर्व पालख्या मारूती मंदिरकडे येऊन तेथून मुख्य मिरवणुकीला सुरूवात होते. आजही येथील नागरिकांनी ही पारंपरिक पद्धत जोपासल्याचे त्यांनी सांगितले.  

कॅम्प परिसरातील पारंपरिक दसरा

बेळगावमधील कॅम्प परिसरात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. शतकोत्तर परंपरा असणारा कॅम्प येथील दसरा पारंपरिक पद्धतीने साजरा होतो. कॅम्प येथील मरिअम्मा देवी, कुंती देवी, मरिमाता व दुर्गामाता, लक्ष्मी देवी, तुलकनमा, मुत्तु मरिअम्मा या मंदिरांमध्ये वैशिष्टय़पूर्ण देवीच्या लाकडी मूर्ती आहेत. ब्रिटीश काळापासून या परिसरात दसऱया दिवशी देवींची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक पाहण्यासाठी बेळगावसह परिसरातून शेकडो भाविक दाखल होत असतात. या मिरवणुकीमध्ये सजविलेले रथ वैशिष्टय़पूर्ण असतात.

Related Stories

मुलासह मातेचा विहिरीत बुडून मृत्यू

Patil_p

खानापूर भाजप युवा संघटना-बजरंग दलातर्फे कोरोना बळीवर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यात मुसळधार सुरूच

Archana Banage

धारवाडने 25 वर्षानंतर एसए श्रीनिवासन चषक जिंकला

Amit Kulkarni

कुटुंबियांनी घेतली विनय कुलकर्णी यांची भेट

Patil_p

शहरवासियांनी सूर्यग्रहणाचा आविष्कार अनुभवला

Patil_p
error: Content is protected !!