Tarun Bharat

पारंपरिक पद्धतीने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक

Advertisements

शहापूर मध्यवर्ती महामंडळाच्या बैठकीत निर्णय

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगावमध्ये पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहात शिवजयंती व चित्ररथ मिरवणूक काढली जाते. शहापूर परिसरात नावीन्यपूर्ण असे चित्ररथ काढले जातात. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे चित्ररथ काढता न आल्याने हिरमोड झाला होता. परंतु यावषी जल्लोषपूर्ण वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाईल, असा सूर शहापूर मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महामंडळाच्या बैठकीत उमटला.

मंगळवारी साई-गणेश सोसायटीच्या सभागृहात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक नेताजी जाधव होते. 2 मे रोजी शिवजयंती असून 4 मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. मंडळांना मध्यवर्ती शिवजयंती महामंडळाकडून सर्व परवानगी मिळेल अशी व्यवस्था करण्याची मागणी मंडळांकडून करण्यात आली. मिरवणूक मार्गावर ज्या अडचणी असतील त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून दूर करू व नाथ पै सर्कल येथे व्यासपीठ उभारून देऊ, असे आश्वासन नगरसेवक नितीन जाधव व नगरसेवक रवी साळुंके यांनी दिले. यावेळी राजकुमार बोकडे, हिरालाल चव्हाण, पी. जे. घाडी, शंकर चौगुले, अशोक चिंडक, गोपाळ बिर्जे, संदीप जाधव, आप्पाजी बस्तवाडकर, प्रशांत चाकूरकर, श्रीधर मंडोळकर, राजू उंडाळे, श्रीधर जाधव, नारायण केसरकर, मंगेश नागोजीचे, रणजीत हावळाण्णाचे, दत्ता पोटे, नवनाथ पोटे, संजय बैलूरकर, दीपक गौंडाडकर उपस्थित होते.

Related Stories

हनुमंत नाईक यांना राष्ट्रीय ग्लोबल आदर्श शिक्षक प्रेरणा पुरस्कार जाहीर

Nilkanth Sonar

कंग्राळी खुर्दमध्ये एकता जनसेवा संघाची स्थापना

Amit Kulkarni

कणपुंबी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप

Amit Kulkarni

पेट्रोल पंपावर मिळणार अत्याधुनिक सेवा

Amit Kulkarni

म. ए. युवा समितीच्या कोविड सेंटरला आर्थिक मदत

Omkar B

राज्य ऍथलेटीक्स स्पर्धेत विश्वंभर कोलेकरला दोन सुवर्णपदके

Amit Kulkarni
error: Content is protected !!