Tarun Bharat

चांदणी चौकातील वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत : 

चांदणी चौकातील पुलाच्या बांधकामात  मोठ्या प्रमाणात स्टीलचा वापर केला गेला होता. ब्लास्ट घडविणाऱ्या कंपन्यांना स्टीलचा अंदाज आला नाही. त्यामुळे ब्लास्ट होऊन देखील पुलाचा काही भाग अद्यापही तसाच आहे. ज्या-ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली होती, त्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त होत आहे. सध्या पोकलेनच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्याचे काम सुरू असून, वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

रात्री 2 वाजून 33 मिनिटांनी चांदणी चौकातील पूल पडला. या पुलाचे दगडी आणि सिमेंटचे बांधकाम स्फोटकांमुळे कोसळले आहे. या पुलाच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले पोलादी स्ट्रक्चर मात्र तसेच आहेत. पेरण्यात आलेल्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया आता अधिकाऱ्यांकडून येत आहे. 

अधिक वाचा : अखेर चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त!

जवळपास अर्धा पूल कोसळला आहे. दुसरा ब्लास्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे सध्या पोकलेनच्या सहाय्याने पूल पाडण्याचे काम सुरू असून, रस्ता रिकामा करण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता आहे.

Related Stories

अनिल देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ६ जुलै पर्यंत ईडी कोठडी

Archana Banage

कोरोना संकट वाढल्याने ICSE बोर्डाकडून दहावीची परीक्षा रद्द

Tousif Mujawar

पुणे विभागात 2.40 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

मंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…

Rahul Gadkar

पुलवामामध्ये चकमक! लष्कर-ए- तोयबाच्या ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Archana Banage

“सरकारची चमचेगिरी करण्याचं काही कारण नाही”

Archana Banage
error: Content is protected !!