Tarun Bharat

पिरनवाडीतील वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी

प्रवाशांची मोठी गैरसोय : पार्किंग-अरुंद रस्त्यामुळे समस्येत भर

प्रतिनिधी /बेळगाव

पिरनवाडी येथे दररोज सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. गोवा तसेच मच्छे, नावगे औद्योगिक वसाहतीला जाणारा हा मार्ग असल्याने साहजिकच वाहनांची संख्या अधिक आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत असून नागरिक व कामगारांना याचा त्रास होत आहे.

पिरनवाडी येथे मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील गावांतील लोक खरेदीसाठी येत असतात, पण वाहन पार्किंगची कोणतीच सोय नाही व त्यातच सर्व वाहने रस्त्यावर पार्किंग केली जातात. रस्त्याची रुंदी कमी असल्याने वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.

व्हीटीयू ते पिरनवाडीपर्यंत दुभाजक घालण्याचे काम सुरू असल्याने सदरची वाहतूक एकेरी होत आहे दोन्हीकडे रस्ता करायचे काम चालू आहे. त्यामुळे याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. दुभाजक घालण्याचे व रस्ता रुंद करण्याचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. काही ठिकाणी दुभाजक घालण्याचे काम झाले आहे. मात्र रस्ता रुंदीकरण रखडल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यातच धुळीचा सामना करावा लागत आहे. खड्डे-उखडलेले रस्ते, अशा विविध कारणांमुळे या महत्त्वाच्या रस्त्यावर सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी होत आहे.

Related Stories

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने बेरोजगारांना गंडा

Omkar B

राष्ट्रीय ज्यु. ऍथलेटिक्स स्पर्धेत तुषार भेकणेचे उत्तम प्रदर्शन

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 90 गावांतील लाभार्थ्यांना हक्कपत्रांचे वितरण

Amit Kulkarni

तिगडी ग्रा.पं.अध्यक्षाचा भीषण खून

Patil_p

बुधवारी 395 अहवाल पॉझिटिव्ह, 12 जणांचा मृत्यू

Patil_p

केंद्र सरकारचे कार्यदर्शी डॉ.अशोक दळवाई यांची यल्लम्मा मंदिरला भेट

Amit Kulkarni