ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूरसह सांगली परिसरात शनिवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. यामुळे कोल्हापूर (kolhapur) जिल्ह्यातील शिरोळ (shirol) तालुक्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. येथील जुन्या टोल नाका जवळील सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर (Sangli-Kolhapur state higway) ओढ्याचे पाणी आल्याने तसेच इतर छोटे मोठे मार्ग बंद झाल्याने रस्त्यावरून वाहतूक संततीने सुरूय. तर दिवाळीची सुट्टी असल्याने अनेक जण आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर वाहनधारकांची गर्दी आहे. तसेच उदगाव जयसिंगपूर स्टेशन रस्ता तसेच बायपास राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाल्याने सांगलीपासून जयसिंगपूर चौंडेश्वरी फाटा ते इचलकरंजी वळण रस्त्यापर्यंत वाहतूक कोंडी निर्माण झालीय.
दरम्यान, पावसामुळे काही मार्ग बंद असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडे होत आहे. त्यामुळे जयसिंगपूर पोलिसांच्या मदतीने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सकाळी सात वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत वाहतूक संत गतीने सुरू होती. अजूनही तीच अवस्था असून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सांगली-कोल्हापूर राज्य महामार्गावर सायंकाळपर्यंत ही कोंडी अशीच राहण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : सांगलीतील व्यापाऱ्याचे ८० लाख लुटले