Tarun Bharat

बाजारात वाहतुकीची कोंडी

खरेदीसाठी नागरिकांची गर्दी : वाहनधारकांची कसरत, रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकींचे पार्किंग केल्याने कोंडीत भर

प्रतिनिधी / बेळगाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे शहरात गुरुवारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. विशेषतः गणपत गल्ली, पांगुळ गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस, खडेबाजार आदी भागात वाहतुकीची कोंडी निर्माण झाल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागली.

लग्नसराई आणि इतर कार्यक्रमांच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढत आहे. शिवाय शनिवारी हनुमान जन्मोत्सव असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी वाढली होती. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांना कसरत करतच बाहेर पडावे लागले.

वाहतुकीला शिस्त लावावी

आठवडाभरात लग्नकार्यांचा धुमधडाका सुरू होणार आहे. त्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. कपडे, भांडी, सराफी दुकाने, फर्निचर, जेवणासाठी लागणाऱया साहित्यांची खरेदी वाढली आहे. त्यामुळे बाजारात गर्दी वाढू लागली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकींचे पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे पोलिसांनी वाहतुकीला शिस्त लावावी, अशी मागणी होत आहे. 

Related Stories

सरस्वती वाचनालयाचा आधारस्तंभ हरपला

Patil_p

आरपीडी कॉलेजमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

Amit Kulkarni

खड्डय़ांमध्ये हरवला जुना धारवाड रोड

Amit Kulkarni

बाची येथील शाळेसाठी स्वयंपाक खोली, शेड मंजूर करण्याची मागणी

Omkar B

21 वर्षांचा तरुण बनला लेफ्टनंट

Patil_p

परराज्यातील वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या

Amit Kulkarni