Tarun Bharat

देवरवाडी मार्गावर वाहतूक कोंडी

Advertisements

भाविकांसह पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी /बेळगाव 

श्रावण सोमवारनिमित्त देवरवाडी येथील वैजनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी वाढल्याने देवरवाडी मार्गावर सोमवारी वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनधारकांना एक तासाहून अधिक वेळ अडकून पडावे लागले. अधून-मधून पाऊस असल्याने वाहनधारकांना कसरत करतच बाहेर पडावे लागले.

याबरोबरच सोमवारी शासकीय सुट्टी असल्याने सुंडी येथील वझर धबधब्यावर पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यामुळे देवरवाडी मार्गावर वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आठवडाभरात झालेल्या दमदार पावसामुळे धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. सोमवारी श्रावणानिमित्त वैजनाथ देवालयात आलेले भाविक आणि वझर धबधब्यावर आलेल्या पर्यटकांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे भाविकांसह पर्यटकांनादेखील नाहक त्रास सहन करावा लागला.

रस्ता अरूंद असल्याने वाहतूक कोंडी

देवरवाडी-महिपाळगड मार्गावर असलेल्या श्री क्षेत्र वैजनाथ मंदिरात श्रावणातील दर सोमवारी दर्शन घेणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. चंदगड, बेळगाव आणि खानापूर येथून भाविक येत असतात. दरम्यान हा रस्ता अरुंद असल्याने चारचाकी आणि दुचाकीधारकांची या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. या बरोबरच रविवार आणि सोमवारीदेखील सुंडी येथील वझर धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली होती. तरुण-तरुणींसह नागरिकांनी या मार्गावर गर्दी केली होती. त्यामुळे धबधब्याच्या मार्गावर देखील वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे पर्यटकांची देखील यातून बाहेर पडताना दमछाक झाली.

Related Stories

किसान रेल्वेतून 56 टन कृषी उत्पादनाची वाहतूक

Patil_p

परीक्षा संपताच दहावीच्या विद्यार्थ्यांचा जल्लोष

Amit Kulkarni

नाशिक-बेळगाव विमानसेवा आजपासून

Amit Kulkarni

राधिका ज्युल्या यांना तीन सुवर्णपदके

Amit Kulkarni

नव्या कायद्याच्या मंजुरीनंतरच कॅन्टोन्मेंट निवडणूक शक्मय

Amit Kulkarni

चन्नम्मा सर्कलमधील फुटपाथचे काम अर्धवट राहिल्याने समस्या

Amit Kulkarni
error: Content is protected !!