Tarun Bharat

चांदणी चौकातील वाहतूक पूर्ववत

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Traffic restored at Chandni Chowk मुंबई-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याच्या चांदणी चौकात असलेला जुना पूल मध्यरात्री नियंत्रित स्फोट घडवून पाडण्यात आला. हा पूल पाडण्यासाठी शनिवारी रात्री अकरा ते रविवारी सकाळी दहा वाजेपर्यंत चांदणी चौकातील वाहतूक प्रशासनाने बंद केली होती. सकाळी 10 नंतर या मार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक पूर्ववत झाली आहे.

सहाशे किलो स्फोटकांचा वापर करून मध्यरात्री 2.33 मिनिटांनी हा पूल पाडण्यात आला. स्फोट होऊन देखील पुलाचा काही भाग तसाच होता. ज्या-ज्या ठिकाणी स्फोटके पेरण्यात आली होती, त्या सर्व स्फोटकांचा स्फोट झाला नसावा, अशी प्रतिक्रिया प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती. दुसरा स्फोट घडविणे शक्य नसल्याने पोकलेनच्या सहाय्याने उर्वरित पूल पाडण्याचे काम सुरू होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. परंतु, राडारोडा हटविण्याच्या कामाला प्रशासनाने गती दिली. सकाळी 10 पर्यंत राडारोडा हटवून दोन्ही मार्ग वाहतुकीसाठी खुले करण्यात आले.

अधिक वाचा : अखेर चांदणी चौकातील पूल जमीनदोस्त!

शनिवारी रात्री 11 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 10 पर्यंत बंद असलेला महामार्ग 10.08 वाजता वाहतुकीसाठी खुला झाला.

Related Stories

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट

datta jadhav

भारतीयांनो सावधान! ऑस्ट्रियात संपूर्ण लॉकडाऊन

Abhijeet Khandekar

शरद पवारांनी घेतली अमित शहांची भेट

Archana Banage

म्याव म्याव करणारे घाबरुन लपून बसलेत : माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर

Abhijeet Khandekar

पाकिस्तान-वेस्ट इंडिज मालिकेबाबत संभ्रमावस्था

datta jadhav

मुख्यमंत्र्यांनी बोलविली १८ एप्रिल रोजी सर्वपक्षीय बैठक

Archana Banage
error: Content is protected !!