Tarun Bharat

‘गुड लक जेरी’चा ट्रेलर प्रदर्शित

ड्रग पेडलरच्या भूमिकेत जान्हवी

‘नशा चाहे जैसा हो, होता हे बेकार, शरीर तोडता, बीमारी लाता, कर देता लाचार’ या वाक्यासह जान्हवी कपूरच्या ‘गुड लेक जेरी’ या चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलरची सुरुवात होते. 2 मिनिटे 50 सेकंदांचा हा व्हिडिओ तुम्हाला हसविणारा, भावुक करणारा आहे, तसेच यात गूढ आणि नाटय़मयता देखील आहे.

एक बिहारी मुलगी आणि तिचे गरीब तसेच आजारी कुटुंब कामाच्या शोधात असताना पंजाबमध्ये फैलावलेली अमली पदार्थांची तस्करी याच्या अवतीभोवती या चित्रपटाची कहाणी घुटमळणारी आहे. 

या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत दीपक डोबरियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद, सुशांत सिंह आणि साहिल मेहता यांच्यासह अनेक कलाकार दिसून येणार आहेत. हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. जान्हवीचा हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे. 29 जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  जान्हवी आणि दीपक दोघांच्याही अभिनयाचे कौतुक होत आहे.

जान्हवी याचबरोबर ‘मिली’ या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच ‘मिस्टर अँड मिसेस माही’ चित्रपटात ती राजकुमार रावसोबत झळकणार आहे. याचबरोबर ‘बवाल’ चित्रपटात ती वरुण धवनसोबत काम करत आहे.

Related Stories

हॉलिवूड अभिनेत्री हिलरीला कोरोनाची लागण

Patil_p

रोहिणी हट्टंगडींचा लॉकडाऊनचा काळ सुखाचा

Patil_p

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा; वाढदिवशी पोस्ट केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

Archana Banage

‘शांकुतलम’ 17 फेब्रुवारीला झळकणार

Patil_p

तापसी पन्नू, अनुराग कश्यपच्या घरी आयकर विभागाची छापेमारी

Tousif Mujawar

मेजर’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त निश्चित

Patil_p