11 नोव्हेंबरला जगभरात झळकणार
मार्व्हल स्टुडिओजचा पुढील प्रोजेक्ट म्हणजेच ‘ब्लॅक पँथर 2’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. याचबरोबर ‘ब्लॅक पँथर-वकांडा फॉरेव्हर’च्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. 2018 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. यात दिवंगत अभिनेता चाडविक बोसमॅनने मुख्य भूमिका साकारली होती. परंतु दुर्दैवाने 2020 मध्ये कर्करोगामुळे त्याचे निधन झाले होते.
ब्लॅक पँथर 2 च्या या ट्रेलरमध्ये ऍक्शनचा भरपूर डोस मिळणार आहे. तर ब्लॅक पँथर-वकांडा फॉरेव्हरच्या य 2 मिनिटे 11 सेकंदाच्या ट्रेलमध्ये चित्रपटातील कलाकार टेनोच ह्यूर्टा, मार्टिन फ्रीमॅन, लुपिता न्योंगो, एंजेला बॅसेट, लेटिटिया राइट आणि विन्स्टन डय़ूक महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येत आहेत. परंतु चाडविकची उणीव या ट्रेलरमध्ये स्पष्टमणे जाणवते.
ब्लॅक पँथर 2 च्या उत्तम ट्रेलरला पाहिल्यावर चित्रपटाच्या चाहत्यांची उत्सुकता दुणावली आहे. ब्लॅक पँथर-वकांडा फॉरेव्हर हा चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचबरोबर हा चित्रपट हिंदी, तेलगू, इंग्रजी, तमिळ, मल्याळी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित केला जाईल.