सोनाक्षी सिन्हा अन् हुमा कुरैशीचा चित्रपट
सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरैशी लवकरच पहिल्यांदा ‘डबल एक्स एल’ या चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या पोस्टर्ससह टीझरही समोर आला आहे. टीझरमध्ये हुमा कुरैशी आणि सोनाक्षी सिन्हा अत्यंत वेगळय़ा अवतारात दिसून आल्या होत्या. आता टी-सीरिजच्या या विनोदी धाटणीच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपट मुलींच्या स्थुलत्वावरून त्यांचे बॉडी शेमिंग करणाऱयांना धडा शिकविण्याचा संदेश देणारा आहे. ‘डबल एक्स एल’चा ट्रेलर अत्यंत आश्वासक वाटत आहे.
हा चित्रपट 4 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे क्रिकेटपटू शिखर धवन बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो हुमा कुरैशीसोबत रोमान्स करताना दिसून येईल. हुमाने शिखरसोबतचे एक छायाचित्र शेअर केले आहे. चित्रपटाची कहाणी आवडल्यानेच यात काम करण्यास होकार दर्शविल्याचे शिखरने म्हटले आहे.