विन डिजल पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत
हॉलिवूडच्या उत्तम सीरिजपैकी एक आहे ‘फास्ट अँड फ्यूरियस’, याची क्रेझ भारतीय प्रेक्षकांमध्येही मोठय़ा प्रमाणात दिसून येते. ही सीरिज स्वतःची जबरदस्त ऍक्शन आणि वाऱयाच्या वेगाने धावणाऱया कार्समुळे प्रचंड लोकप्रिय आहे. आता या सीरिजचा पुढील चित्रपट ‘फास्ट 10’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
हॉलिवूड ऍक्शन थ्रिलर चित्रपट ‘फास्ट 10’चा अधिकृत ट्रेलर निर्मात्यांनी सादर केला आहे. ट्विटरवर निर्मात्यांनी हा ट्रेलर शेअर केला आहे. फास्ट अँड फ्यूरियस 10 म्हणजेच ही सीरिज फास्ट 10 या नावाने प्रदर्शित होत आहे. याचा ट्रेलर प्रदर्शित करताना कॅप्शनमध्ये ‘रस्ता जेथे संपतो तेथून प्रवास सुरू होतो’ असे नमूद करण्यात आले आहे.


लुइस लेटेरियर यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटत विन डीजल, जैसन मोमोआ, जॉन सिना, ब्राय लार्सन, टायरिस गिब्सन, सुंग कांग, चार्लीज थेरॉन, डेनिएला मेलचियर यासारखे दिग्गज कलाकार दिसून येणाराआहेत. चित्रपटात विन डीजल पुन्हा डोम टोरटोच्या भूमिकेत झळकणार आहे.
‘फास्ट अँड फ्यूरियस’ सीरिजचा हा अखेरचा चित्रपट असल्याची चर्चा आहे. विन डीजलने यासंबंधीचा संकेत देत ही प्रेंचाइजी बराच काळ चालली असून याचा अंत आवश्यक असल्याचे म्हटले होते.