विक्की कौशल, कियारा अन् भूमी पेडणेकरचा चित्रपट
विक्की कौशलने आतापर्यंत चित्रपटांमध्ये गंभीर धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत, परंतु आता ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटात तो विनोदी भूमिका करताना दिसून येणार आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात विक्कीसोबत कियारा आडवाणी अन् भूमी पेडणेकर यांचाही समावेश आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीपासून सस्पेन्सची झलक दिसून येत आहे.
विक्की कौशल यात पत्नीवर नाखुश असलेल्या पतीची भूमिका साकारत आहे. तर त्याच्या पत्नीच्या भूमिकेत भूमी पेडणेकर आहे. कियाराने विक्की कौशलच्या व्यक्तिरेखेच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची कथा एका हत्येभोवती घुटमळणारी आहे. या चित्रपटात विक्की कौशलची कियारा अन् भूमीसोबत एकदम नवी परंतु मजेशीर केमिस्ट्री दिसून येत आहे. विक्कीने यापूर्वी भूमीसोबत ‘भूत पार्ट वन ः द हाँटेड शिप’ चित्रपटात काम केले होते. तर कियारासोबत तो ‘लस्ट स्टोरीज’ सीरिजमध्ये दिसून आला होता.
गोविंदा नाम मेरा हा चित्रपट 16 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतानने केले आहे. तर करण जौहरने याची निर्मिती केली आहे. खेताननेच याची पटकथा लिहिली आहे.