Tarun Bharat

रेल्वे धावताहेत उशिरा

दुरुस्तीच्या कामामुळे होतोय विलंब

प्रतिनिधी /बेळगाव

गुंजी व खानापूर या परिसरात रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे लेंढा ते बेळगाव दरम्यान रेल्वे उशिराने धावत आहेत. काही एक्स्प्रेस तर तब्बल दोन ते तीन तास उशिराने पोहोचत असल्याने प्रवासाची वेळ वाढली आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दि. 20 ते 30 नोव्हेंबर दरम्यान प्रि-इंटरलॉकिंगचे काम सुरू असल्याने रेल्वे उशिराने धावत आहेत. यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने हुबळी ते मिरज या दरम्यान धावणाऱया अनारक्षित एक्स्प्रेस रद्द केल्या तर काही रेल्वेंच्या मार्गात बदल केला आहे. ठिकठिकाणी सुरू असणाऱया दुरुस्तीच्या कामामुळे रेल्वे उशिराने धावत आहेत.

हुबळीहून बेळगावला येणाऱया एक्स्प्रेस तब्बल दोन ते तीन तास उशिराने येत आहेत. सकाळच्या सत्रात येणाऱया बेंगळूर-बेळगाव व बेंगळूर मिरज या दोन्ही एक्स्प्रेस दोन ते तीन तास उशिराने दाखल झाल्या. याचबरोबर तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेसही दोन तास उशिराने दाखल होत आहे. यामुळे पुढच्या प्रवासाला जाणाऱया नागरिकांना रेल्वेस्थानकावर ताटकळत बसण्याची वेळ आली आहे. बेळगाव रेल्वेस्थानकावर या संबंधित माहिती पत्रक लावण्यात आले

Related Stories

ओमनी कारची अज्ञात वाहनाला धडक

Patil_p

दुसऱया दिवशीही बसची चाके थांबलेलीच

Amit Kulkarni

अतिवाड मराठी शाळेत स्वच्छतागृह बांधकामाचा शुभारंभ

Amit Kulkarni

गोंधळी समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी धरणे

Amit Kulkarni

अंकोला नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी भाजपच्या शांतला नाडकर्णी

Patil_p

जुगार खेळणाऱया 9 जुगाऱयांना अटक

Patil_p