प्रतिनिधी /बेळगाव
राज्यातील 8 आयएएस अधिकाऱयांच्या सोमवारी बदल्या करण्यात आल्या आहेत. बेळगावचे प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांची बेंगळूर विभागाच्या प्रादेशिक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.
अम्लान आदित्य बिस्वास हे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून ओळखले जातात. कोरोनाकाळात सिव्हिल हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवा कोलमडली होती. त्यावेळी राज्य सरकारने सिव्हिल हॉस्पिटलची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली होती. वर्षभरात त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलचा कायापालट केला आहे.
वेगवेगळे उद्योजक व दात्यांकडून निधी जमवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विकासकामे राबविली. तेथील व्यवस्थेला शिस्त लावण्याचे कामही हाती घेतले होते. आता त्यांची बेंगळूरला बदली झाली आहे.