प्रतिनिधी/ पणजी
कार्मिक खात्यातर्फे शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पंचायत सचिव मिनिनो डिसोझा यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याशिवाय शिक्षण सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उद्योग, व्यापार आणि वाणिज्य खात्याच्या संचालक स्वेतिका सचन यांच्याकडे राज्य कर आयुक्तपदाचा ताबा देण्यात आला आहे. संजीव आहुजा यांच्याकडे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव तसेच गोवा व्यावसायिक सामाजिक जबाबदारी प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सोपविण्यात आला आहे.
दुसऱया एका आदेशात कार्मिक खात्याने 13 वरि÷ अधिकाऱयांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार दीपेश प्रियोळकर यांची गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक (प्रशासन) आणि गोवा फुटबॉल गोवा विकास प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून मॅन्युएल बार्रेटो, गोवा कोकणी अकादमीच्या सचिवपदी मेघनाथ परब, वस्तुसंग्रहालयाच्या संचालक म्हणून उपासना माजगावकर, जलस्रोत खात्याच्या संचालकपदी (प्रशासन) शंकर गावकर, गोवा मानवाधिकार आयोग सचिवपदी बिजू नाईक,
पंचायत-2 (दक्षिण) खात्याच्या अतिरिक्त संचालकपदी संगीता नाईक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे (दक्षिण) प्रकल्प संचालक म्हणून प्रवीण बरड, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रोहित कदम, उत्तर गोवा जिल्हा पंचायतच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून फ्लोरिना कुलासो, राज्यपालांचे संयुक्त सचिव म्हणून गौरीश शंखवाळकर, उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-3 म्हणून पुंडलिक खोर्जुवेकर आणि प्रोव्हेदोरिया संचालक म्हणून विनायक वळवईकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.