Tarun Bharat

शिक्षक अजय काळे यांची बदली करा

Advertisements

प्रतिनिधी / खानापूर : तालुक्यातील खेमेवाडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक अजय काळे यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी खेमेवाडी शाळा सुधारणा समिती पालक तसेच पंच कमिटी यांच्यावतीने तालुका शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची यांच्या कार्यालयात दोन तास ठिय्या आंदोलन करून बदलीचे बदलीच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

सीडीएमसीने अजय काळे यांच्या वर्तणुकीबद्दल अनेक तक्रारी राजेश्वरी कुडची यांच्याकडे कथन केल्या तसेच गेल्या दोन वर्षापासून अजय काळे हे विद्यार्थ्यांना सातत्याने मारबड करत आहेत दहशत घालत आहेत. तसेच शाळेतील वर्तणूक शिक्षकाला शोभेल असे नाही. यासाठी या शिक्षकाची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सुट्टी संपल्यानंतर शाळेला टाळे ठोकण्यात येईल असा इशाराही यावेळी ग्रामस्थांनी दिला.

यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष हुवाप्पा येळ्ळुरकर, परसराम चोपडे, पल्लवी चोपडे, मल्हारी
खाबले, बाळू चोपडे मल्हारी गणे बैल कर विष्णू कांबळे लक्ष्मी सावंत माधुरी थांबले पूजा चोपडे नीलम खांबले लीला गनैबलकर यासह मोठ्या संख्येने पालक. ग्रामस्थ पंचमंडळी उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी कुडची यांनी निवेदनचा स्वीकार करून आपण याबाबत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले

Related Stories

यल्लापूरनजीक अपघातात चौघे जण जागीच ठार

Patil_p

कलाश्री ग्रुप योजनेतून ग्राहकांना बक्षीस जाहीर

Amit Kulkarni

महिला क्रिकेट स्पर्धेत जैन पँथर्स विजेते

Amit Kulkarni

Kolhapur : महाराष्ट्रातील उद्योग बाहेर गेल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसची रॅली

Kalyani Amanagi

खंडणीप्रकरणात बेळगावच्या तोतया पोलिसाला अटक

datta jadhav

सीमोल्लंघन कार्यक्रम मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत

Amit Kulkarni
error: Content is protected !!