मुख्य निवडणूक अधिकारीपदी रमेश वर्मा
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील 14 आयएएस अधिकाऱयांच्या (सचिव) बदल्या करण्यात आल्या असून गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून रमेश वर्मा यांची नियुक्ती झाली आहे. शिवाय सचिवांच्या खात्यांची देखील पुनर्रचना करण्यात आली आहे.
संजित रॉड्रीग्स यांच्याकडे गृहनिर्माण, मुद्रण, स्टेशनरी, नागरी पुरवठा, कारखाने बाष्पक, राज्यशिष्टाचार ही खाती सोपवण्यात आली आहेत. गोवा राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव पदही त्यांना देण्यात आले आहे. संजीव गडकर यांच्याकडे गृह, कार्मिक खात्याचा कारभार देण्यात आला असून कर्मचारी भरती आयोगाचे सचिवपदही बहाल पेले आहे. संदीप जॅकीस यांच्याकडे सर्वसामान्य प्रशासन, महसूल, कायदा-न्याय, कामगार-रोजगार खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.
अरूणकुमार मिश्राा यांना पर्यावरण, कृषी, पशुसंवर्धन, मच्छिमार ही खाती सोपवण्यात आली आहेत. राजशेखर यांना वीज, आरोग्य, म†िहला बालविकास या खात्यांची सचिवपद जबाबदारी देण्यात आली आहे. अजित रॉय यांच्याकडे मुख्यमंत्रा सचिवपद, क्रीडा, युवा व्यवहार, माहिती तंत्रज्ञान खाते देण्यात आले आहे. पुनितकुमार गोयल हे मुख्य सचिवपदी कायम असून त्यांच्याकडे आरोग्य, हवाई वाहतूक, खाण, वन, पर्सनल, सार्वजनिक बांधकाम खात्याचा कारभार देण्यात आला आहे.
डॉ. व्ही. कांदावेलू यांना वित्त, उद्योग, बंदर, हस्तकला, नदी परिवहन ही खाती सोपवण्यात आली असून गोवा कर्मचारी निवड आयोगाचे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एम.आर. राव यांना वाहतूक, सहकार, अधिकृत भाषा, वजन-माप, लोकायुक्त (सचिव) सार्वजनिक गाऱहाणी ही खाती मिळाली आहेत. मिनिनो डिसोझा यांना पंचायत, ग्रामीण विकास, पुरातन पुरातत्व खाते अशी जबाबदारी मिळाली आहे. रवी धवन यांना शिक्षण, पर्यटन, कौशल्य विकास या खात्यांचा कारभार देण्यात आला आहे.
संजय गिहार यांना कला-संस्कृती, म्युझियम, नगरविकास, माहिती प्रसिध्दी ही खाती देण्यात आली आहेत. पर्सनल खात्याचे अवर सचिव एकनाथ सावंत यांनी हा बदल्यांचा खते पुनर्रचना आदेश जारी केला असून त्याची कार्यवाही तातडीने करण्यास बजावले आहे.