Tarun Bharat

वंदे भारत ट्रेनमधून मुंबई-सोलापूर प्रवास करायचायं, जाणून घ्या तिकीट दर

Mumbai-Solapur Vande Bharat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी योजना असलेली वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मुंबई ते सोलापूर व्हाया पुणे व शिर्डी अशी धावणार आहे.त्यासाठी राज्यभरात चाचणी घेण्यात आली. तर येत्या १० फेब्रुवारीला वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)स्टेशनहून सुटेल.ही गाडी मुंबई, पुणे आणि शिर्डीमार्गे सोलापूरकडे रवाना होईल. मुंबई ते पुणे हे अंतर केवळ १ तास ५० मिनिटात पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर समोर आले आहेत. कसे असणार आहेत हे दर जाणून घेऊया.

वंदे भारत ट्रेनचे तिकीट दर
मुंबई ते पुणे चेअर कारसाठी ५६० रुपये आणि एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी ११३५ रुपये.
मुंबई ते नाशिकसाठी चेअर कार ५५० रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी ११५० रुपये.
मुंबई ते शिर्डी चेअर कार ८०० रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी १६३० रुपये.
मुंबई ते सोलापूर चेअर कारसाठी ९६५ रुपये तर एक्झिक्यूटिव्ह कोर्टसाठी १९७० रुपये.
वंदे भारत एक्सप्रेस दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. इगतपुरी ते पुणतांबा दरम्यान ही ट्रेन ताशी ११० किमी वेगाने धावेल.

Related Stories

झगमगती दुबई

tarunbharat

Devgiri Fort : महाराष्ट्राचे एक दुर्गवैभव : देवगिरी किल्ला

Abhijeet Khandekar

आता दिल्लीतही अनुभवा गावचा फिल; पर्यटन विभागाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Archana Banage

248 आसनी विमानातून एकटय़ाने प्रवास

Amit Kulkarni

अमरनाथ यात्रेला २ वर्षांनंतर पुन्हा सुरुवात; सुरक्षेत वाढ

Abhijeet Khandekar

चार धाम यात्रेतील मृतांची संख्या कशामुळे वाढली;चला पाहूया…

Kalyani Amanagi