Tarun Bharat

गणेशोत्सवासाठी गावी येणारे प्रवासी वेटिंगवर

Advertisements

26 ते 30 ऑगस्टदरम्यान आरक्षण फुल्ल : मुंबईवरून विशेष रेल्वेची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

गणेशोत्सव अजून दीड ते दोन महिन्यांवर असताना मुंबई ते बेळगाव या मार्गावरील रेल्वेचे आरक्षण फुल्ल होत आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी गावी येणाऱया गणेश भक्तांना वेटींगवर रहावे लागत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात मुंबई ते बेळगाव अथवा हुबळी या मार्गावर विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

बेळगाव परिसरातील हजारो नागरिक कामानिमित्त मुंबई येथे आहेत. हे नागरिक दरवषी गणेशोत्सवाला बेळगावमध्ये दाखल होत असतात. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे संकट असल्याने बरेचसे नागरिक गणेशोत्सवाला येऊ शकले नाहीत. त्यामुळे यावषी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गावी परतणार आहेत. गणेशोत्सव काळात गावी येता यावे यासाठी दोन महिने आधीपासून बुकींग केले जात आहे.

मुंबई ते बेळगाव या दरम्यान धावणारी चालुक्मय एक्स्प्रेस व हुबळी-दादर एक्स्प्रेस या दोन्ही एक्स्प्रेसचे 26 ते 30 ऑगस्ट दरम्यान आरक्षण फुल्ल झाले आहे. बऱयाच गणेश भक्तांचे आरक्षण वेटींगवर आहे. गणेशोत्सव काळात खासगी वाहतुकीचे दर गगनाला भिडत असल्याने आतापासूनच गणेश भक्तांकडून बुकींग करण्यात येत आहे. अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबई ते बेळगाव आरामदायी प्रवास करता येत असल्याने रेल्वेला पसंती दिली जात आहे. त्यामुळे मुंबई ते हुबळी या दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्रालयाकडे गणेशभक्तांनी केली आहे.

महाराष्ट्र-गोव्यासाठी 214 विशेष रेल्वे, मात्र बेळगावसाठी एकही नाही

रेल्वे मंत्रालयाने गणेशोत्सव काळात 214 विशेष रेल्वे सोडल्या आहेत. मुंबई येथून महाराष्ट्र व गोवा या दोन राज्यातील विविध शहरांमध्ये या विशेष रेल्वे धावणार आहेत. यातील सर्वाधिक म्हणजेच 74 रेल्वे या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मिरज, बेळगाव, हुबळी या परिसरात येण्यासाठी एकही विशेष रेल्वे रेल्वे मंत्रालयाने सोडलेली नाही. त्यामुळे मुंबईहून बेळगावला येणाऱया दोन रेल्वेंवर गणेश भक्तांना अवलंबून रहावे लागत आहे.

Related Stories

श्रावण महिन्यात धार्मिक कार्यक्रमांसाठी मनपाची परवानगी आवश्यक

Patil_p

सुझुकी व्ही. स्ट्रॉमचे उद्घाटन

Amit Kulkarni

रामदुर्ग तालुक्यात 1383 उमेदवारांचे भवितव्य पेटीबंद

Patil_p

आजही सरकारी बससेवा ठप्पच राहणार

Patil_p

इंडस् अल्टम स्कूलला ग्रॅन्ड ज्युरी ऍवॉर्ड

Omkar B

बेळगुंदी विभागीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ

Amit Kulkarni
error: Content is protected !!