Tarun Bharat

लम्पिस्कीन जनावरांवर योग्य उपचार करा

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे बेळगुंदी-बिजगर्णी भागातील शेतकऱ्यांची मागणी

वार्ताहर /किणये

तालुक्याच्या पश्चिम भागात लम्पिस्कीन आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या भागातील जनावरे दगावलेली आहेत. बेळगुंदी- बिजगर्णी भागातील लम्पिस्कीन’च्या जनावरांना योग्य उपचार द्या अशी मागणी या भागातील ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

बुधवारी बेळगुंदी येथील पशुचिकित्सालय केंद्राला भेट देऊन ज्या जनावरांना लम्पिस्कीन रोगाची लागण झालेली आहे. त्या जनावरांना औषधोपचार योग्य पद्धतीने करण्यात यावा. जेणेकरून या भागातील लम्पिस्कीन रोगाचे प्रमाण कमी होईल अशी मागणी बेळगुंदी पशुवैद्यकीय अधिकारी लक्ष्मण जमगी यांच्याकडे केली आहे.

बेळगुंदी बीजगर्णी भागातील सुमारे 11 जनावरे लम्पिस्कीनमुळे दगावलेली आहेत. तसेच अजूनही ब्रयाच जनावरांना लम्पिस्कीन रोगाची लागण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारी

बेळगुंदी पशु केंद्राच्यावतीने या भागातील जनावरांना व्यवस्थित उपचार पद्धती होत नाही. अशाही तक्रारीही काही शेतकऱ्यांनी केल्या.

बिजगर्णी ग्रामपंचायत अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अॅड. नामदेव मोरे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला व येत्या काही दिवसांमध्ये अन्य एका डॉक्टरची या ठिकाणी नेमणूक करण्यासाठी प्रयत्न करा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

बेळगुंदी पशु केंद्रामध्ये एक डॉक्टर आणि एक सहकारी आहेत.त्यामुळे अजूनही एका सहकारी डॉक्टरांची आवश्यकता आहे असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी अप्पू कांबळे, शट्टूपा चव्हाण, विक्रम जाधव ,गंगाराम मोरे व इतर शेतकरी उपस्थित होते

Related Stories

दोन मुलांसह आईची आत्महत्या

Amit Kulkarni

पिकात गांजा पिकविणाऱया शेतकऱयाला अटक

Omkar B

टिळकवाडी येथे मसाज सेंटरवर छापा

Tousif Mujawar

वाऱ्या पावसामुळे भात-ऊस पीक जमीनदोस्त

Patil_p

कर्जावरील व्याजदरात कपात करण्याची मागणी

Amit Kulkarni

न्यू इंडियन क्राफ्ट एक्स्पोला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद

Amit Kulkarni