Tarun Bharat

भारतीय गायींच्या मदतीने नैराश्यावर उपचार

ऑस्ट्रेलियात मनोरुग्णांना होतेय मदत

ऑटिझम पीडितांमध्ये गायींच्या वास्तव्यात सुधारणा

भारतीय गायींद्वारे ऑस्ट्रेलियात मानसिक दृष्टय़ा आजारी लोकांवर उपचार केले जात आहेत. येथील नॉर्थ क्वीन्सलँडमध्ये काऊ कडलिंग सेंटर तयार करण्यात आले असून तेथे मानसिक शांततेसाठी लोक गायींना आलिंगन देत आहेत. गायींसोबत वेळ घालवून त्यांना मनशांती मिळत आहे. याकरता रितसर शुल्क आकारण्यात येत आहे. चालू वर्षात 4 एनडीआयएस कंपन्या (नॅशनल डिसेबिलिटी इन्शोरन्स स्कीम) याला स्वतःच्या नव्या स्कीममध्ये स्थान देण्याची योजना आखत आहेत. या स्कीमसाठी भारतीय गायींची निवड करण्यात आली आहे.

मानसिक समस्येला तोंड देणाऱया डोना एस्टिल काऊ कडलिंग फार्मवर गायींची सेवा करत आहेत. मानसिक दृष्टय़ा आजारी असूनही त्यांना येथे नोकरी मिळाली आहे. त्या पर्सनॅलिटी डिसऑर्डर, भीती आणि नैराश्याने त्रस्त आहेत. हळूहळू त्या यातून बऱया होत आहेत. या भारतीय गायींनी माझा जीव वाचविला आहे. एक वर्षापूर्वी जर कुणी मला काऊ थेरपीबद्दल सांगितले असते तर मी हा विषय हसण्यावारी नेला असता असे डोना यांनी म्हटले.

प्रत्येक गायीचे स्वतःचा वेगळा स्वभाव असतो, गायी तुम्हाला आतून बऱया करतात. येथील गायी ऑटिझम स्पेक्ट्रमध्ये पीडित रुग्णांसाठी थेरपिस्ट ठरल्या आहेत. त्यांच्यावर देखील गायींच्या सान्निध्यात उपचार केले जात आहेत असे एस्टिल यांनी सांगितले.

गायींशी होते मैत्री

ऑटिझम आजाराने पीडित व्यक्ती अन्य व्यक्तींशी सहजपणे मिसळून जाऊ शकत नाही. अशा स्थितीत त्यांना प्राण्यांसोबत खूपच सहजपणा जाणवतो. हळूहळू ते माणसांसोबत देखील जोडून घेऊ लागतात. ऑस्ट्रेलियात आता इक्वाइन थेरपीला पर्याय म्हणून काऊ थेरपी लोकप्रिय होतेय. ब्रिस्बेनमधील 10 वर्षीय पॅट्रिक ऑटिझमने ग्रस्त आहे. तो येथे गायींसोबत मजेत वेळ घालवितोय. त्याचे आईवडिल त्याला नियमितपणे येथे आणत असल्याची माहिती वैज्ञानिक टेंपल ग्रँडिन यांनी दिली आहे.

गायींच्या सान्निध्यात मनशांती

या फर्ममध्ये लोकांना बरे होताना मी पाहत आहे.  येथे अनेक प्रकारच्या मानसिक आजारांनी ग्रस्त लोक येत आहेत. रेसमधील अश्वांसोबत मी दीर्घकाळ घालविला आहे. ते आक्रमक असतात. कधीही तुमच्यावर हल्ला करू शकतात. गायींसोबत वेळ घालवून मात्र केवळ मनशांती आणि आनंद मिळत असल्याचे फर्मचे संस्थापक लॉरेन्स फॉक्स यांनी म्हटले.

Related Stories

लवकरच युक्रेनवर हल्ला करू शकतो रशिया

Patil_p

फिल्मी नव्हे, हे सत्य आहे

Patil_p

जग फिरून चिमुकला करतोय मोठी कमाई

Amit Kulkarni

केनेडींचा मारेकरी होता केजीबीच्या संपर्कात?

Amit Kulkarni

रशियाच्या आण्विक पाणबुड्य़ा अटलांटिक महासागरात तैनात

Patil_p

जर्मनीत लॉकडाऊन; 5 दिवस कठोर निर्बंध

datta jadhav