प्रतिनिधी /पेडणे
रविवारी पेडणे तालुक्मयात पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने पेडणे अग्निशामक दलाची बरीच दमछाक झाली. पेडणे आग्निशामक दलाचे जवान भर पावसात आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांना साहाय्य करत आहेत. रविवारी सकाळी पराष्टे येथे मोठे जंगली झाड पडल्याने काहीवेळ रास्ता वाहतुकीसाठी बंद झाला. वीज वाहिन्या तुटल्याने तसेच वीज खांब मोडल्याने वीज खात्याचे नुकसान झाले.
मालपे पेडणे येथे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या कार्यालयाजवळ नारळाचे झाड पडल्याने रास्ता वाहतुकीसाठी बंद झाला, अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन भर पावसात लोकांसाठी व वाहनांसाठी माड कापून रस्ता मोकळा केला .
प्रामुख्याने अग्निशामक दलाचे हवालदार विठ्ठल परब, जवान अमोल परब, जवान राजेश परब, जवान अमित सावळ व नगरपालिकेचे कामगार यांनी पावसाची पर्वा न करता पडलेली झाडे कापून रस्ता वाहतूकीसाठी खूला केला.