बेळगाव : प्रतिनिधी
शुक्रवारी झालेल्या वादळी पावसामुळे अतिवाड संपर्क रस्त्यावर झाड कोसळून पडले आहे. परिणामी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती रात्री उशीराने झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. रस्यातच झाड कोसळल्याने वाहनधारकांना घरी पोहचण्यासाठी कसरत करावी लागली.
शुक्रवारी दुपारपासून दमदार पावसाला सुरूवात झाली. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी झाडांची पडझड झाली. अतिवाड क्रॉसपासून गावाकडे जाणाऱ्या संपर्क रस्त्यावर झाड कोसळल्याने संपूर्ण रस्त्याच झाकला गेला होता. परिणामी गावाकडे परतणाऱ्या वाहनधारकांसमोर घरी पोहोचयचे कसे? असा प्रश्न पडला होता. दरम्यान गावातील काही समाजिक कार्यकर्त्यानी एकत्रित येत झाड बाजूला हटविले. त्यामुळे मार्ग मोकळला झाला. शिवाय वाहनधारकांना देखील दिलासा मिळाला.