Tarun Bharat

पश्चिम भागात पावसामुळे दोन ठिकाणी झाडे कोसळली

Advertisements

बेळगुंदी व नावगे-हुंचेनहट्टी रोडवर झाडे पडली : वाहतुकीची कोंडी : सुदैवाने जीवितहानी टळली

वार्ताहर /किणये

तालुक्याच्या पश्चिम भागात होत असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी दोन ठिकाणच्या रस्त्यावर झाडे कोसळली आहेत. बेळगुंदी रोड, बिजगर्णी क्रॉस येथे रस्त्याच्या मध्यभागी झाड कोसळले. तसेच नावगे-हुंचेनहट्टी रस्त्यावर झाड पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, झाडे पडल्यामुळे दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

बिजगर्णी क्रॉस, बेळगुंदी मुख्य रस्त्यावर बुधवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान भलेमोठे झाड कोसळले. हे झाड विद्युत तारांवर पडले. यामुळे झाडाच्या बाजूचे दोन विद्युत खांबही कोसळून पडले.

बेळगुंदी-राकसकोप रस्त्यावर वाहनधारकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. सुदैवाने कोणत्याही वाहनावर झाड कोसळले नाही. मात्र, विद्युत खांब व झाड कोसळल्याने मुख्य रस्त्यावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर वाहनधारकांच्या रांगा लागल्या होत्या.

विद्युत तारांवर झाड कोसळल्याने बेळगुंदी गावात सुमारे दोन तास विद्युत पुरवठा बंद करण्यात आला होता. मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने या भागातील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नावगे-हुंचेनहट्टी रस्त्यावर चिंचेचे झाड कोसळले. बुधवारी सकाळी 11.45 च्या दरम्यान झाड कोसळले असल्याची माहिती बामणवाडी व कुट्टलवाडी येथील नागरिकांनी दिली.

रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. तसेच नावगे गावाला येणारी बसही कुट्टलवाडी येथूनच परतली. धान्यसाठय़ाच्या गोडावून जवळील रस्त्यावर झाड कोसळले होते. नावगे येथील संजय हुंबरवाडी, नागराज हुरकडली, गावडू गुरव आदींसह धान्यसाठय़ाच्या गोडावूनमधील काही कामगारांनी मिळून झाडाच्या फांद्या बाजूला करून वाहतुकीस मार्ग मोकळा करून दिला.

Related Stories

विठूनामाच्या गजरात किणये- हब्बनहट्टी पायी दिंडीचे प्रस्थान

Patil_p

असंख्य पात्र लाभार्थींची पेन्शन बंद

Amit Kulkarni

प्रलंबित वसाहत योजना मार्गी लावणार

Amit Kulkarni

विजयनगर येथील नागरिकांनी आमदारांसमोर मांडल्या व्यथा

Amit Kulkarni

निधी नसल्याचे सांगून आनंदनगर रस्त्याचे काम अर्धवट

Omkar B

खानापूर-हत्तरगुंजी रस्ता अपूर्ण

Amit Kulkarni
error: Content is protected !!