फॅशन-रुबाबामुळे मागणीत वाढ : तरुणी-महिलांचीही पसंती
प्रतिनिधी /बेळगाव
अलीकडे कोल्हापुरी चप्पलची पेझ असून तरुणाईकडून या चप्पलना मागणी वाढली आहे. त्यामुळे कोल्हापुरी तरुणाईचा रुबाब वाढवत आहे. बदलत्या काळानुसार युवक-युवतींची फॅशन आणि डेसकोडनुसार चप्पलना पसंती दिली जात आहे. शनिवारी कडोलकर गल्लीत रस्त्यावर विकणाऱया कोल्हापुरी चप्पलना मागणी वाढली होती.
अलीकडे लग्नकार्य, समारंभ व शाही कार्यक्रमांसाठी तरुणाईच्या अंगात कुडता व पायात कोल्हापुरी हमखास पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोल्हापुरींना मागणी वाढत आहे. पावसाळा संपून हिवाळय़ाला प्रारंभ झाला आहे. शिवाय येत्या उन्हाळय़ासाठीही कोल्हापुरींना पसंती दिली जात आहे. वेगवेगळय़ा पॅटर्नमधील कोल्हापुरी चप्पल ग्राहकांचे लक्ष वेधत आहेत. फ्लॅट चपलांमुळे हा ट्रेंड रुजला आहे. त्यामुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांपासून महिलावर्गापर्यंत या चप्पल दिसत आहेत. तरुणी आणि महिलाही या चपलांना पसंती देत आहेत. त्यामुळे एखाद्या शाही कार्यक्रमात रुबाब वाढविण्यासाठी या चपलांची खरेदी केली जात आहे.
काही वर्षांपूर्वी केवळ अंगठा असलेल्या चप्पल किंवा सँडलची फॅशन होती. त्यानंतर चामडी बुटांचा टेंड आला. आता पारंपरिक कोल्हापुरी चप्पलचा टेंड वाढू लागला आहे. या चपलांमुळे एक वेगळा रुबाब आणि चालताना होणारा कर कर आवाज आणि विविध प्रकारात केलेली बांधणी तरुणाईला आकर्षित करू लागली आहे. त्यामुळे तरुणाई या चपलांकडे वळताना दिसत आहे.
या चप्पल वेगवेगळय़ा नमुन्यामध्ये आणि पॅटर्नमध्ये पाहायला मिळत आहेत. कापसी, आठपट्टी, चारपट्टी, कटिंग कान, पुडा कापसी, कुरुंदवाडी, महाराजा टाईप आदींना मागणी आहे. साधारण 500 रुपयांपासून 2 हजार रुपयांपर्यंत या चप्पल उपलब्ध आहेत. पूर्वी वडीलधारी मंडळींच्या पायात या चप्पल दिसत होत्या. मात्र, अलीकडे या चप्पलचा ट्रेंड वाढला असून लहान मुलांपासून तरुणाई या चप्पलना प्राधान्य देताना दिसत आहे. उन्हाळय़ात गरमी आणि इतर कारणांमुळे चामडय़ाच्या कोल्हापुरी चपलांचा वापर अधिक होतो. त्यामुळे आता थंडी आणि गरमीलादेखील सुरुवात होत आहे. त्यामुळे या चामडय़ाच्या कोल्हापुरी चप्पलांची खरेदी सुरू झाली आहे.
कोल्हापुरी चप्पलना ऐतिहासिक वारसा आहे. पूर्वी राजे-महाराजे आणि संस्थानिक या चपलांचा वापर करत होते. वडीलधारी मंडळींबरोबर आता तरुण-तरुणीही कोल्हापुरी चप्पल वापरत आहेत. रबरी आणि प्लास्टिक चपलांच्या तुलनेत चामडय़ाच्या कोल्हापुरी चप्पल आरोग्याच्या दृष्टिकोनातून लाभदायक आहेत.
साधना यादव, कोल्हापुरी चप्पल विपेत्या