Tarun Bharat

आदिवासींना मिळणार जमिनींचे हक्क

Advertisements

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे आश्वासन : अनेक मान्यवरांना ’प्रज्ञावंत’ पुरस्कार

प्रतिनिधी /पणजी

वन हक्क कायद्यांतर्गत आदिवासी समाजातील सर्व बांधवांना जमिनीचे रहिवासी हक्क देण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

आदिवासी कल्याण विभागातर्फे येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृहात आयोजित ’प्रेरणा दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी चळवळीसाठी बलिदान दिलेल्या दिलीप वेळीप आणि मंगेश गावकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्यात येतो. यावेळी सावर्डेचे आमदार गणेश गावकर, कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास, आदिवासी कल्याण सचिव रवी धवन, एसटी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, आदिवासी कल्याण संचालक त्रिवेणी वेळीप, युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्स (उटा) चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांची उपस्थिती होती.

वन हक्कासंबंधी 10 हजार प्रकरणे प्रलंबित

वन हक्क कायद्यांतर्गत सध्या सुमारे 10 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. आदिवासी भागात राहणाऱया सुमारे 135 बांधवांना आतापर्यंत सरकारने त्यांच्या जमिनींच्या सनद दिल्या आहेत. लवकरच उर्वरित दावेही निकाली काढण्यात  येणार असून येत्या वर्षभरात किमान दीड हजार दावेदारांना सनदा दिल्या जातील. त्यापुढील सुमारे अडीच वर्षात सर्व दावे निकाली काढण्यावर भर असेल. मात्र त्यासाठी सरकारला व्यक्ती आणि पंचायतींकडून सहकार्य मिळाले पाहिजे, असे पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आदिवासी संशोधन केंद्र, संग्रहालय

मुख्यमंत्र्यांनी लवकरच सांगे येथे आदिवासी संशोधन केंद्र तसेच फर्मागुडी येथे आदिवासी संग्रहालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पांसाठी केंद्राने या आधीच निधी मंजूर केला आहे. आदिवासी भवन प्रकल्पाची पायाभरणीही झाली आहे. मात्र काही कारणास्तव तो प्रकल्प अडचणींच्या गर्तेत सापडला आहे. लवकरच या सर्व समस्या सोडवून प्रकल्पाचे काम मार्गी लागेल, असेही ते म्हणाले.

आदिवासी भागात योजना शिबिरे

समाजातील चांगले काम करणाऱया सदस्यांना हात द्या व त्यांच्या प्रेरणेतून इतरांना जीवनात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारी सुविधा आणि योजना आदिवासी समाजाच्या घराघरात पोहोचविण्यासाठी आदिवासी भागात लवकरच जागृती शिबिरे घेण्यात येणार आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

यावेळी आदिवासी समाजातील रोहिदास मडकईकर (कृषी), सतिश भिवा वेळीप (शिक्षण), गोविंद शिरोडकर (संस्कृती), कु. प्रतिक्षा गावणेकर (क्रीडा) यांना  त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल आदिवासी प्रज्ञावंत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

Related Stories

मडगावच्या समस्या सोडविण्यास दिगंबर कामत अपयशी

Amit Kulkarni

बहुभाषिकता ही निसर्गाने गोव्याला दिलेली सुंदर भेट!

Amit Kulkarni

वास्को शहर व परीसरात लॉकडाऊनला पहिल्या दिवशी उत्तम प्रतिसाद, शहरात तुरळक वर्दळ

Amit Kulkarni

चोवीस तासात कोरोनाचे 12 बळी

Patil_p

हणजूणमध्ये कर्लीजच्या बाजूला आढळला कुजलेला मृतदेह

Amit Kulkarni

मयेच्या श्रीरामपुरुष देवस्थानचा आज वर्धापनदिन कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची उपस्थिती

Amit Kulkarni
error: Content is protected !!