पणजी : वर्ष 2011 मध्ये बाळ्ळी येथे झालेल्या आंदोलनात शहीद झालेले दिलीप वेळीप आणि मंगेश गावकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. 25 मे रोजी राज्यभरातील अनुसूचित जमाती समाजाचे सदस्य मडगाव येथे लोहिया मैदानावर आयोजित कार्यक्रमातून या दिवंगत आदिवासी युवा नेत्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.b गोवा अनुसूचित जमाती संघटना आणि ‘मिशन पॉलिटिकल रिझर्वेशन फॉर शेड्युल ट्राइब्स’ या दोन्ही संघटनांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती शुक्रवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेतून देण्यात आली. त्यावेळी अॅङ जॉन फर्नांडीस, गोविंद शिरोडकर, उपासो गावकर, कांता गावडे, जोजफ वाझ, फ्रान्सिस कुलासो, ज्यायसी डायस, कॉस्टांटिनो फालेरो, रामा काणकोणकर, रवींद्र वेळीप, पोब्र फर्नांडीस आदींची उपस्थिती होती. आपल्या विविध मागण्यांसाठी आदीवासी समाजातील लोकांनी आंदोलन पुकारले होते. त्याला दि. 25 मे 2011 रोजी अचानक हिंसक वळण लागले. त्यात वरील दोन उमदे तऊण शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ येत्या 25 मे रोजी अनुसूचित जमातीच्या नेत्यांनी लोहिया मैदानावर सकाळपासून उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. सायंकाळी 3.30 नंतर राज्यभरातील समाजबांधवही त्यात सहभागी होणार आहेत. त्यानंतर होणाऱ्या ‘चितन आणि मंथन’ कार्यक्रमात समाजातील विचारवंत आपल्या विविध मागण्यांच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकतील. गोव्यातील एसटी समुदायाच्या सदस्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Articleम्हापशात 80 हजारांचा गांजा जप्त
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.