Tarun Bharat

रसिका मेताळचा सत्कार

वार्ताहर /अगसगे

अगसगे येथील विद्यार्थिनी रसिका ज्योतिबा मेताळ हिने कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवत राष्ट्रपातळीवर निवड झाल्याबद्दल स्थानिक शाळा सुधारणा कमिटीच्यावतीने तिचा सत्कार करण्यात आला.

विजापूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील लच्यान्न गावामध्ये झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये मुलींच्या 62 किलो फ्रीस्टाईल गटात तिने सुवर्णपदक मिळविले आणि राष्ट्रपातळीवर खेळण्यासाठी निवड झाल्याने श्री सिद्धरामेश्वर शिक्षण संस्था संचलित श्रीमती लीलावती व्यंकटेश करगुप्पीकर हायस्कूलच्या स्थानिक शाळा सुधारणा कमिटीच्या आणि शिक्षकांच्यावतीने शाल व हार घालून रसिकाचा सत्कार करण्यात आला.

रसिकाने गावचे आणि हायस्कूलचे नाव राष्ट्रपातळीवर पोहोचवले आहे. तिच्या या यशाबद्दल स्थानिक शाळा कमिटी व शिक्षकांतर्फे कौतुक करण्यात आले. यावेळी शाळा कमिटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

जुन्या धारवाड रोडवरील धोकादायक खड्डा बुजवा

Amit Kulkarni

संगीत निर्मिती क्षेत्रात सर्वोत्कृ होण्याची ‘मंझील’

Patil_p

शिवबसवनगर येथे क्वारंटाईन करण्यास विरोध

Patil_p

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करा

Amit Kulkarni

एसपीएम रोडवर वाहतुकीची कोंडी

Patil_p

कोरोना देवदूत सन्मान पुरस्काराने बालाजी चिखले यांचा सत्कार

Amit Kulkarni