Tarun Bharat

आकाशात 22 हजार फुटांवर फडकला तिरंगा

Advertisements

प्रतिनिधी/ नवारस्ता

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पाटणच्या सूरज शेवाळे या पॅरा एस. एफ. कमांडोने काश्मिरमध्ये चार्टर विमानातून तब्बल 22 हजार फूट उडी मारून स्वातंत्र्याचा तिरंगा हवेत फडकवला.

    सूरज शेवाळे हा सातारा जिह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी या गावचा सुपूत्र असून तो 2017 मध्ये भारतीय सैन्यदलात भरती झाला असून सध्या तो जम्मू काश्मिरमध्ये सेवा बजावत आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सूरजने हवेत तिरंगा फडकविण्याचा निर्धार केला होता.

 सूरजचे प्राथमिक शिक्षण हे गव्हाणवाडी-चोपदारवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मरळी येथील कै. वत्सलादेवी देसाई हायस्कूलमध्ये झाले. उच्च माध्यमिक शिक्षण पाटण येथील बाळासाहेब देसाई विद्यालयात झाले. शेतकरी कुटुंबात जन्मलेला सूरज लहानपणापासूनच अत्यंत जिद्दी मेहनती, धाडसी आणि हुशार आहे. त्याने सैनिक होऊन देशसेवेचे स्वप्न पहिल्याच प्रयत्नात पार पाडले असल्याची प्रतिक्रिया सूरजची आई लता शेवाळे यांनी दिली.

 मंत्री देसाई यांच्याकडून अभिनंदन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सूरज शेवाळे यांनी दाखविलेले हे धाडस आणि देशप्रेम अभिमानास्पद आहे. त्यांचे अभिनंदन करत असल्याचे ट्विट राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.

Related Stories

नगरपालिका शिक्षण मंडळ सेवक सहकारी संस्थेतर्फे लाभांश जाहीर

Patil_p

लॉकडाऊन काळात नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे – नगराध्यक्ष वडगाव नगरपरिषद

Abhijeet Shinde

लुधियाना बॉम्बस्फोट प्रकरणी दहशतवादी मुलतानीला जर्मनीतून अटक

Sumit Tambekar

सातारा : क्वारंटाईन झालेल्यांचा कचरा पार्किंगमध्ये पडून

Abhijeet Shinde

माणुसकीच्या देवदूतांचा लोकमान्यकडून गौरव

Patil_p

Solapur; प्रेमी युगलांनी घेतला एकाच ओढणीने गळफास; तरुणाचा मृत्यू तर मुलगी अत्यावस्थ

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!