Tarun Bharat

तृणमूल काँग्रेसच्या प्रवक्त्याला अटक

गुजरात पोलिसांनी जयपूर विमानतळावर घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ जयपूर

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते साकेत गोखले यांना सोमवारी रात्री उशिरा जयपूर विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. सूडाच्या राजकारणापोटी भाजपच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने मंगळवारी केला आहे.

साकेत गोखले यांनी मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी ट्विट केला होता याचमुळे ही कारवाई करण्यात आल्याचा दावा तृणमूल खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी केला आहे. परंतु तृणमूलने गोखले यांच्या ट्विटबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. साकेत गोखलेंनी सोमवारी रात्री नवी दिल्लीहून राजस्थानच्या जयपूरसाठी विमानप्रवास केला होता. जयपूर विमानतळावर गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे.  मंगळवारी पहाटे 2 वाजता गोखले यांनी स्वतःच्या आईला फोन करत पोलीस आपल्याला अहमदाबाद येथे नेत असल्याचे कळविले होते. या कॉलनंतर पोलिसांनी त्यांचा फोन आणि सामग्री जप्त केल्याचा दावा डेरेक यांनी केला आहे.

अहमदाबादच्या सायबर सेल पोलिसांनी गोखले यांच्याकडून मोरबी पूल दुर्घटनेप्रकरणी करण्यात आलेल्या ट्विटवरून खोटा गुन्हा नोंदविला आहे. अशाप्रकारच्या कारवाईतून तृणमूल काँग्रेसचा आवाज दडपता येणार नसल्याचे डेरेक यांनी म्हटले आहे. तर याप्रकरणी भाजप तसेच गुजरात सरकारने कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

गुजरातच्या मोरबी शहरात 30 ऑक्टोबर रोजी पूल दुर्घटना झाली होती आणि यात 130 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोरबीचा दौरा केला होता. मोदींच्या मोरबी दौऱयाकरता 30 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा साकेत गोखले यांनी ट्विट करत केला होता.

Related Stories

एनआरसीच्या भीतीने बांगलादेशींचे पलायन

Patil_p

ज्याला चालणे शिकविले, त्यानेच आम्हाला चिरडले!

Patil_p

पंचमसाली आरक्षण : न्या. सुभाष आडी समितीला अंतरिम स्थगिती

Patil_p

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 8रेल्वेगाडय़ांचा प्रारंभ

Patil_p

सुरक्षेत भर : 51 के-9 वज्र तोफांचा समावेश

Patil_p

पाचव्या चारा घोटाळय़ात लालू यादव दोषी

Patil_p