वृत्तसंस्था/ आसनसोल
पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या गुरे तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलेले तृणमूल काँग्रेसचे नेते अनुव्रत मोंडल यांचा जामिनाचा अर्ज येथील सीबीआय न्यायालयाने फेटाळला आहे. मोंडल यांना 24 ऑगस्टपर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेशही न्यायालयाने शनिवारी दिला. तपास अधिकाऱयांना मोंडल हे प्रामाणिकपणे सहकार्य करीत नसल्याचे सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात नमूद केले. अटक करण्यापूर्वी मोंडल यांना अनेकदा समन्स पाठविण्यात आले होते. तथापि, त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला, असे कारण दाखवून सीबीआय वकिलांनी मोंडल यांच्या जामीन अर्जाला विरोध केला. न्यायालयाने तो मान्य केला.