Tarun Bharat

चोरीप्रकरणी त्रिकुटाला अटक

3 लाख 55 हजाराचा ऐवज जप्त : गोकाक पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी /बेळगाव

गोकाक शहरामध्ये दुचाकी चोरी करणे, महिलांच्या गळय़ातील दागिने लांबविणे, असे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू होते. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली होती. याप्रकरणी पोलिसांनी छडा लावून तिघांना अटक करून त्यांच्याकडील दुचाकी आणि सोन्याचे दागिने जप्त केले.

गोकाक-योगीकोळ्ळ रस्त्यावर मोटारसायकलवरून तीनजण संशयितरित्या फिरत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता दुचाकी आणि सोने चोरी केल्याची कबुली दिली. फेब्रुवारी महिन्यामध्ये एका महिलेच्या गळय़ातील सोन्याचे मंगळसूत्र लांबविले होते. त्यानंतर जून महिन्यामध्ये विद्यानगर बसव मंडपजवळ महिलेच्या गळय़ातील मंगळसूत्र लांबविल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर दोन दुचाकी चोरल्याचीही कबुली दिली. त्यांच्याकडून 80 हजार किमतीच्या दोन मोटारसायकली, 2 लाख 75 हजार रुपये किमतीची 50 ग्रॅम सोन्याची दोन मंगळसूत्रे असा एकूण 3 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. गोकाकचे डीवायएसपी मनोजकुमार नाईक, पोलीस निरीक्षक गोपाळ आर. राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. डी. घोरी, एएसआय रमेश हडपद, डी. व्ही. नेर्ले, सुरेश इरगार, मल्लाप्पा तिडीगिरी, सचिन होळेपगोळ, विठ्ठल नायक, रमेश मुरनाळे यांनी ही कारवाई केली आहे.

Related Stories

चोरी प्रकरणी तरुणाला अटक

Patil_p

डेनेजसाठी खोदाई, जलवाहिनीचे नुकसान

Amit Kulkarni

दुचाकी अपघातात महिला ठार

tarunbharat

रेल्वे मार्गा विरोधात 200 शेतकऱ्यांच्या हरकती दाखल

Rohit Salunke

शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

बामणवाडीत ट्रकमधून घसरली धान्याची पोती

Amit Kulkarni