तृषा कृष्णन ही दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतीतील नावाजलेली अभिनेत्री आहे. काही काळापूर्वी तृष्णा ही मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वम’ म्हणजेच पीएस1 चित्रपटात दिसून आली होती. तर आता ती ‘रंगी’ या तमिळ चित्रपटावरून चर्चेत आहे. तृषाने चित्रपटसृष्टीतील स्वतःच्या कारकीर्दीची 20 वर्षे पूर्ण केली आहेत. तृषाने यानिमित्त चाहत्यांपासून कलाकार तसेच दिग्दर्शकांचे आभार मानले आहेत.
चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीचा प्रवास निश्चितपणे सोपा नव्हता. माझ्या प्रवासात अनेक उतार-चढाव आले, परंतु अखेरीस प्रेक्षकांनी माझ्यावर विश्वास ठेवला असे वाटते. माझ्या स्टायलिस्टपासून मेकअप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिस्ट या सर्वांचे माझ्या कारकीर्दीत योगदान आहे. माझ्यासाठी भूमिकांचे लेखन करणाऱया दिग्दर्शकांचीही मी आभारी असल्याचे तृषाने म्हटले आहे.
वासुदेव मेनन अणि मणिरत्नम यांच्यासारख्या दिग्दर्शकांनी मला नजरेसमोर ठेवून चित्रपटात भूमिका दिल्या आहेत. थलपति विजय याच्यासोबतच्या चित्रपटाची घोषणा संबंधित निर्मातेच करणार असल्याचे तृषाने एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे. तृषाने आतापर्यंत तमिळ, तेलगू तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्वतःच्या अभिनयासाठी तृषाला ओळखले जाते.