तरुणभारत ऑनलाइन
श्रावण महिन्यात उपवास करून शिवशनकारांची आराधना केली जाते. श्रावणातील चारही सोमवारी उपवास केला जातो.पण उपवास करताना खिचडी आणि वरई खाऊन कंटाळा येतो. यासाठी पर्याय म्हणून सध्या उपवासाचे अनेक पदार्थ केले जातात. मग त्यामध्ये उपवासाचे थालीपीठ, उपवासाचे डोसे, उपवासाची इडली, उपवासाची भजी यांचा समावेश होतो. आज आपण अशीच एक चटकदार आणि झणझणीत उपवासाची रेसिपी पाहणार आहोत. या साठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे,
साहित्य :
साबुदाण्याची खिचडी
शेंगदाण्याची आमटी
साबुदाणा चिवडा
बटाट्याची शेव
बटाटा वेफर्स
खारे किंवा तेलात तळलेले शेंगदाणे
मिरची आणि जिऱ्याचा ठेचा
बारीक चिरलेली काकडी
मीठ
साखर
लिंबू
दही
शेंगदाणा आमटी :
दोन हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे मिक्सरमध्ये पाणी घालून वाटून घ्या. कढईत तेल किंवा तूप घालून त्यात जिरे तडतडवून घ्या. त्यात शेंगदाण्याचे वाटण, मीठ आणि चवीपुरती साखर घाला. आणि आमटी उकळल्यावर गॅस बंद करा.
मिसळ कृती :
एका डिशमध्ये खिचडी घ्या. तुम्हाला हवा असल्यास वरईचा भात देखील तुम्ही घेऊ शकता. त्यावर चमचाभर साबुदाणा चिवडा, थोडीशी बटाट्याची शेव, कुस्करलेले वेफर्स आणि चमचाभर दही घाला. त्यावर मिरचीचा ठेचा,चिरलेली काकडी खारे किंवा तळलेले शेंगदाणे आवडीनुसार घाला. हवं असल्यास लिंबू पिळा. या मिसळीसोबत गरमागरम आमटी द्या. मिसळ एकजीव करण्यासाठी आवडीनुसार त्यात आमटी घेता येते. अशी ही तोंडाला चव आणणारी ही उपवासाची मिसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा.