सोयाबीन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. आजकाल सोयाबीनचे अनेक पदार्थ बनवले जातात. पण आज आपण संध्याकाळच्या चहासोबत चटपटीत खाण्यासाठी सोयाबीनचे कटलेट कसे बनवायचे ते पाहणार आहोत.
साहित्य :
अर्धा कप सोयाबीनचा चुरा
पाव कप चना डाळ
१ उकडलेला बटाटा
आले लसूण आणि मिरची पेस्ट – १ चमचा
गरम मसाला – अर्धा चमचा
जीरे पावडर – १ चमचा
बारीक चिरलेली कोथिंबीर
पाव कप ब्रेड क्रम्स,
दोन चमचे तेल,
चवीपुरते मीठ.
कृती
सर्वप्रथम चना डाळ आणि सोयाबीनचा चुरा एक तास पाण्यात भिजवून घ्या. नंतर दोन्ही जिन्नस पाण्यातून बाहेर काढा. यानंतर प्रेशर कुकरमध्ये सोयाबीनचा चुरा आणि चना डाळ एक कप पाणी टाकून शिजवून घ्या.आणि थंड झाल्यावर मिक्सरमध्येवाटून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका बाऊलमध्ये काढून घेऊन त्यात स्मॅश केलेला बटाटा,धने जिरे पावडर, मिरची, आले लसून पेस्ट, मीठ, गरम मसाला,कोथबिंर टाकून एकत्र करावे. या मिश्रणाचे हातावर दाबून गोलाकार कटलेट बनवावे. फ्राय पॅनमध्ये तेल टाकून त्यात हे कटलेट ब्रेड क्रम्समध्ये घोळवून,शॅलो फ्राय करावेत. सॉस किंवा पुदीना चटणीबरोबर गरमा गरम आणि टेस्टी कटलेट सर्व्ह करावे.


previous post