Spring Onion Pakoda Recipe: पावसाळ्यात आणि थंडीच्या वातावरणात गरमागरम भजी सर्वानाच आवडते.मग त्यात कांद्याची भजी असेल तर त्याची मजा काही औरच. पण तुम्ही कधी कांद्याच्या पातीची भजी खाल्ली आहे का? या पातीची भाजी जेवढी टेस्टी लागते तेवढेच त्याची भजी देखील चविष्ट लागते. जी बनवायला देखील खूप सोपी आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या ही भजी कशी बनवायची.
साहित्य
कांद्याची पात
१ हिरवी मिरची (चिरलेली)
१ चमचा आल्याची पेस्ट
अर्धा कप बेसन
पाव चमचा लाल तिखट
पाव चमचा टीस्पून हळद
अर्धा चमचा गरम मसाला पावडर
अर्धा चमचा धने पावडर
अर्धा चमचा ओवा
चवीनुसार मीठ
तळण्यासाठी तेल
कृती
कांद्याच्या पातीचे भजे बनवण्यासाठी प्रथम एका भांड्यात ५ ते ६ कांद्याच्या पती बारीक चिरून घ्या. यांनतर त्यामध्ये आल्याची पेस्ट,मीठ, हिरव्या मिरचीचे काप आणि वरील सर्व मसाले घालून एकत्र करून १५ मिनिटे बाजूला ठेवा.आता त्यात बेसन आणि १-२ चमचे पाणी घालून घट्ट पीठ बनवा. आता कढईत तेल गरम करा आणि मंद आचेवर पकोडे सोनेरी आणि क्रिस्पी होईपर्यंत तळा. आता गरमागरम पकोडे हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करा.

